खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेतील कर्जे स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)चे होम लोन, ऑटो लोन बुधवार पासून स्वस्त होणार आहे. बँक ऑफ बडोदाने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ०.१५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे आता होम लोन, ऑटो आणि पर्सनल लोन हे देखील स्वस्त होणार असून नवीन दर बुधवार पासून लागू होणार आहेत.

MCLR रेट मध्ये कपातीमुळे लाेनमध्ये कपात होते आणि आधीच्या तुलनेने कमी EMI ग्राहकांना द्यावा लागतो. भारतीय रिझर्व बँक (RBI) ने फेब्रुवारी पासून आतापर्यंत रेपो दरांमध्ये ०.७५ टक्के इतकी कपात केली आहे. त्यामुळे याचा लाभ लवकरात लवकर ग्राहकांना देऊन कर्जे स्वस्त करण्यास RBI ने सांगितले आहे.

किती स्वस्त होणार कर्ज :

कपातीनंतर आता १ वर्षाच्या कालावधीसाठी जाणाऱ्या कर्जासाठी MCLR ८.६० टक्क्यांहून कमी होऊन ८.४५ टक्के इतके होतील. बँकेच्या एक दिवस आणि एका महिन्याच्या अवधीच्या कर्जावरील व्याजाचे दर देखील अनुक्रमे ८.०५ % आणि ८.१५ % इतके होतील जे आधी ८.२० आणि ८.३० इतके होते. तर तीन आणि सहा महिन्यांच्या कर्जावरील व्याज देखील ०.१५ टक्क्यांनी घटून ८.२५ % आणि ८.४० % होतील.

काय आहे MCLR :

याचा फुल फॉर्म मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट असा असून हा एक बेंचमार्क दर असतो ज्याद्वारे बँक आपल्याद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाचे दर निश्चित करत असते. हा दर कमी झाल्यास कर्जे स्वस्त होतात तर दर वाढल्यास कर्जे महाग होतात.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like