वीज-पाणी बिलासह लग्‍नाच्या ‘या’ खर्चावर आता ५ % TDS !, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ संकल्पात सरकारने आयकरात कोणतेही बदल केले नसले तरी सामान्य करात मात्र वाढ केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला पाणी, वीज बिल आणि लग्नाच्या वस्तू यावर जास्त कर भरावा लागणार आहे, कारण आता सरकार या अत्यंत महत्वाच्या बाबीवर थोडेथोडका नाही तर तब्बल ५ % टीडीएस लावण्याच्या तयारीत आहे.

आता प्रॉपर्टी खरेदी करताना क्लब सदस्यता शुल्क, कार पार्किंग, वीज आणि पाणी बिल, मेंटनेंस शुल्क या प्रॉपर्टी वर जोडण्यात येत आहे. त्यामुळे या बाबीवर देखील लवकरच टीडीएस लागण्याची शक्यता आहे. मानले जात आहे की, १ सप्टेंबर पासून हे लागू होऊ शकतात.

तसेच जर तुम्ही लग्नासाठी इवेन्ट मॅनेजरला ५० लाख रुपयांपेक्षा आधिकचे काम द्याल तर तुम्हाला या ट्रानजेक्शनवर ५ टक्के टीडीएस लागेल.

प्रॉपर्टी विक्रीपर टीडीएस जोडल्यास, सर्व शुल्काचा समावेश केल्यास कर विभागाकडे प्रॉपर्टी सेलसंबंधित सर्व माहिती पोहचेल. कारण टीडीेएस वाचवण्यासाठी बिल्डर काही रक्कम विविध शुल्काच्या आधारे घेतो. यामुळे कर विभागाला प्रॉपर्टीची खरी किंमत कळत नाही.

यावर लागू शकतो टीडीएस –

एखाद्या व्यक्ती किंवा हिंदू संयुक्त कुटूंबातील व्यक्तीने ५० लाख रुपयांपेक्षा आधिक पेमेंट कोणत्याही प्रोफेशनल किंवा कॉन्ट्रक्टरला दिले तर त्यांना त्यावर ५ टक्के टीडीएस देण्यात येईल. जर तुम्ही एखाद्या कॉन्ट्रक्टरला घराच्या कामासाठी किंवा ५० लाख रुपयांपेक्षा आधिक रुपये देऊन काम करुन घेत असाल तर तुम्हाला त्या ट्रांजेक्शनवर ५ टक्के टीडीएस लागू शकतो.

काय आहे टीडीएस –

टीडीएस म्हणलं की अनेकांच्या समस्या वाढतात. जर तुम्हाला पगार मिळत असेल तर यावर सरकार काही प्रमाणात कर लावते, तुमच्या पगारातून काही रक्कम कापण्यात येते. या आधारे सरकार आपला महसूल वाढवते. टीडीेएस विविध प्रकारे कापला जातो. जसे की पगार, कोणतीही गुंतवणूकीवर मिळणारे व्याज यावर टीडीएस लावण्यात येतो.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान