अमेरिकेमुळं चीनला 29 वर्षातील सर्वात मोठा ‘दणका’ ! 1990 च्या निच्चांकी स्तरावर GDP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेबरोबर दीर्घकाळ चालणार्‍या ‘ट्रेड वॉर’मुळे चीनचा जीडीपी विकास दर २९ वर्षांच्या नीचांकावर आला आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने चीनच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये चीनची जीडीपी विकास दर ६.१ टक्के होता, जो गेल्या तीन दशकांतील सर्वात कमी आहे. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने १९९० नंतरची सर्वात खराब कामगिरी केली आहे. देशांतर्गत मागणीची कमकुवतता आणि अमेरिकेसमवेत व्यापार युद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यात गुरुवारी आंशिक व्यापार करार झाला आहे, ज्यावर आंतरराष्ट्रीय बाजाराला सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे उपपंतप्रधान लियू हे यांनी एका विशेष समारंभात या करारावर स्वाक्षरी केली. व्यापारी कराराच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत, दोन्ही देश यापुढे एकमेकांवर अतिरिक्त आयात शुल्क लादणार नाहीत. या व्यापार करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थांना दिलासा मिळणार आहे

व्यापार युद्धामुळे चीनची आर्थिक परिस्थिती झपाट्याने खालावली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा परिणाम सुमारे ५०० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांच्या व्यापारावर होत आहे. दरम्यान, करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर चिनी माध्यमांना संबोधित करताना लियू हे म्हणाले की कराराच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही बाजूंच्या सामान्य समस्या दूर झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एका अभ्यासानुसार, इतर काही देशांमध्ये यावर्षी जीडीपी विकास दरात थोडी वाढ अपेक्षित आहे. जागतिक आर्थिक वाढीचा दर सर्वात कमी २.३ टक्के होता, असे संयुक्त राष्ट्र संघाने गेल्या वर्षी सांगितले.

तसेच भारताबद्दल, अहवालात असे म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षातील आर्थिक विकास दर ७.७ टक्के असू शकतो. दरम्यान, डब्ल्यूईएसपी २०१९ मध्ये ते ७.६ टक्के असण्याचा अंदाज होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like