Lockdown : ‘डॉमिनोज’ आणि ITC देणार दैनंदिन जीवनाला लागणार्‍या वस्तू ‘घरपोच’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसाच प्रादुर्भाव देशात वाढत असून या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान डॉमिनोज आणि आयटीसी फूड्स यांच्यामध्ये आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करण्याबाबत एकर करार झाला आहे. तसे पत्रक दोन्ही कंपन्यांनी प्रसिद्ध केले आहे. डॉमिनोजच्या वितरण विभागाच्या माध्यमातून ग्राहकांना दररोज आवश्यक असलेला किराणा सामानाची होम डिलीव्हरी करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच होम डिलीव्हरी करताना संसर्ग रोखण्यासाठी सूचनांचे पालन केले जाईल असेही या पत्रकात म्हटले आहे.

ग्राहक घरी बसून वस्तूंची अशा प्रकारे खरेदी करु शकतात

कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मिरची, धणे आणि हळद यासारख्या मसाले यांच्या शिवाय आशीर्वाद पीठाचे मोठे पॅकेट डॉमिनोजच्या अॅपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या अॅपची सेवा सुरु करण्यात आली असून ग्राहकांना प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना अपडेटेड अॅपचा वापर करावा लागेल आणि ‘डॉमिनोज आवश्यक विभाग’ यावर क्लिक करून आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तूंची ऑर्डर देता येईल.

ही सुविधा कोठे उपलब्ध असेल

ही सुविधा पहिल्यांदा बंगळूर आणि त्यानंतर नोएडा, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबादमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की डॉमिनोजचे ‘सेफ सप्लाई स्पेशालिस्ट’ वस्तूंचे पॅकेट वितरीत करताना कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करतील. तसेच वस्तूची डिलीव्हरी करताना ग्राहक डिलिव्हरी करणाऱ्याच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.