PF च्या खातेधारकांसाठी मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळं लाखो कर्मचार्‍यांना बसु शकतो ‘झटका’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही वेतनधारक असाल, ईपीएफओ मध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण पीएफमधील व्याज दरात कपात करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्त असे आहे की या आर्थिक वर्षात व्याज दरात 15 ते 25 बेसिस पॉइंट्सने कपात होऊ शकते. त्यामुळे पीएफ खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर कमी परतावा मिळेल.

लाखो लोक आपल्या पगारातील एक हिस्सा ईपीएफओमध्ये गुंतवतात. या एकूण रक्कमेवर वर्षाच्या अंती व्याज मिळते. त्यामुळे व्याजदरात कपात झाली तर 31 मार्चला 2020 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षात मोठा झटका लागू शकतो. ईपीएफओने 2018-19 मध्ये 8.65 टक्के दराने व्याज दिले आहे.

एका सरकारी कर्मचाऱ्याच्या मते अर्थव्यवस्थेत आलेल्या सुस्तीमुळे, कर्ज बाजारात घटणाऱ्या परतावा यामुळे कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. त्यात जर 15 ते 25 बेसिस पॉइंटने कपात केल्यास आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही.

या महिन्याच्या अखेरीस ईपीएफओच्या वार्षिक दराची घोषणा होऊ शकते. 2018 – 19 मध्ये हा दर 8.65 टक्के होता. त्यानंतर ईपीएफओकडे 151 कोटी रुपयांची सरप्लस रक्कम शिल्लक होती. 2017 – 18 नंतर सरप्लस रक्कम 586 कोटी रुपये होती.

फेसबुक पेज लाईक करा –