खुशखबर ! सलग 5 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण पहायला मिळाली आहे. आज सोमवारी देखील या दरांमध्ये घसरणीची नोंद करण्यात आली. पेट्रोल दर 11 पैशानी आणि डिझेलचे दर 20 पैशानी कमी झाले आहेत. यानंतर दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 75.09 रुपये इतका झाला असून एक लिटर डिझेलचा दर 68.45 रुपये इतका आहे.

प्रमुख चार शहरातील पेट्रोल – डिझेलचे दर –
इंडियन ऑइल या वेबसाइट वरून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई येथे पेट्रोलचे दर वाढून अनुक्रमे 74.98 रुपये, 77.58 रुपये, 80.58 रुपये आणि 77.89 रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर याच शहरांमध्ये डिझेलचा दर अनुक्रमे 68.26 रुपये, 70.62 रुपये, 71.57 रुपये आणि 72.13 रुपये आहे.

रोज सकाळी 6 वाजता बदलतात किमती –
पेट्रोल डिझेलचे दर रोज कमी जास्त होत राहतात. मात्र याचे नवे दर हे सकाळी सहा वाजता लागू होतात.

SMS च्या माध्यमातून जाणून घ्या तुमच्या शहराचे दर –
तुम्हाला नवीन दरवाढ माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही 92249 92249 यावर मेसेज पाठवून पेट्रोल डिझेलचे नवीन दर माहिती करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 यावर पाठवावा लागेल.

म्हणजेच समजा तुम्ही दिल्लीमध्ये असला तर दर माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला RSP 102072 लिहून 92249 92249 वर पाठवावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा –