… म्हणून सोनं-चांदी पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसचा आता संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसला. जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशांतर्गत सराफ बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्ली सराफ बाजारात सोनं 133 रुपयांनी महागलं. चांदीच्या किंमतीत देखील तेजी आली असून चांदी 238 रुपयांनी महागली.

सोन्याचे दर –
आठवड्याच्या पहिल्यांच दिवशी सोनं 133 रुपयांनी महागल्याने सोनं 41,292 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,578 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 18.15 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर –
सोमवारी चांदी महागल्याने 47,277 रुपयांवर पोहचली, आज चांदीच्या दरात 238 रुपयांनी वाढ झाली.

का महागलं सोनं-चांदी –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर ॲनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडल्याने सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. तसेच चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.