सोन्या-चांदीच्या दरावर देखील चीनच्या जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसचा ‘परिणाम’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनसह जगभरातील अनेक देशात कोरोना वायरसमुळे तणाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला. जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या चीनमध्ये मागणी घटल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात शुक्रवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 96 रुपयांनी महागलं. तर चांदी 238 रुपयांनी महागली.

सोन्याचे दर –
सोनं 96 रुपयांनी महागल्याने सोनं 40,780 रुपये झाले. गुरुवारी दिल्लीत सोनं 40,723 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,558 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.80 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले.

चांदीचे दर –
चांदी तब्बल 238 रुपयांनी महागली त्यामुळे चांदी 47,277 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. गुरुवारी चांदीच्या किंमतीत घसरणं झाली होती. औद्योगिक मागणी घटल्याने चांदी 47,082 रुपये प्रति किलो ग्रॅम झाले होते.

HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की भारतीय रुपया गडगडल्याने सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. चीनमध्ये घातक वायरसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीवर दबाव आला आहे.

सोन्याच्या किंमतीवर चीनमधील कोरोना वायरसचा प्रभाव –
जगातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज हाऊसने सांगितले की, चीन जगातील सर्वात मोठा दुसरा सोन्याचा ग्राहक आहे. परंतु कोरोना वायरसमुळे सोन्याची मागणी घटली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like