‘या’ प्रमुख कारणामुळे सोन्याचे भाव ‘कडाडले’ ; जाणून घ्या कधी होईल सोने ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली. ‘अखिल भारतीय सराफ’ संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (शनिवारी) सोन्याच्या किमतींमध्ये ७० रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा भाव ३४,३७० रुपये प्रति तोळा इतका झाला होता. तज्ज्ञांच्या माहितीनुसार अमेरिकेच्या सेंट्रल बैंक फेडरल रिज़र्व ने सध्याच्या बैठकीत बैठक व्याजदर स्थिर ठेवले असून आगामी काळातील पुढच्या बैठकीत मात्र हे व्याजदर कमी होण्याचे संकेत आहेत.

सध्या अमेरिकन डॉलरच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव पाहता गुंतवणूकदारांनी अमेरिकेत गुंतवणूक न करता सुरक्षित गुंतवणुकीस प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. असे असल्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये १००० रुपये प्रति तोळा एवढी वाढ होण्याची शक्याता आहे. अशात जर दागिने खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर काही दिवस थांबून वाट पाहिलेले फायदेशीर राहील कारण सध्यातरी किमती कमी होण्याची काहीही शक्यता दिसून येत नाही.

मागील तीन दिवसांमध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमती ३३,७४० वरून वाढून ३४,३७० इतक्या झालेल्या आहेत. असे असताना चांदीच्या दरांमध्ये मात्र थोडीशी म्हणजे १०० रुपयांनी घसरण होऊन चांदीची किंमत ३९००० रुपये प्रति ग्राम इतकी झाली.

का वाढत आहेत सोन्याचे भाव :
अमेरिकेने इराणवर हल्ल्याची धमकी दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत सोन्याच्या किमती वेगाने वाढत आहेत. याचे कारण आहे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीस घेतलेला आखडता हात. अमेरिका आणि इराणच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलरची किंमत घसरतासुन त्याचा सरळ प्रभाव सोन्याच्या भावावर पडत असून सोने महाग होत आहे. चांदीचेही भाव मोठ्या प्रमाणात वधारले होते मात्र शेवटी कमी होत काहीसे स्थिर झाल्याचे दिसून आले.

मागील पाच महिन्यामधील सोन्याचा सर्वाधिक भाव :
दिल्लीच्या सराफ बाजारातील सोन्याचे आजचे भाव २८ फेब्रुवारी २०१९ नंतर सर्वाधिक आहेत. २८ फेब्रुवारीला सोन्याचे भाव ३४,२०० रुपये प्रति तोळा एवढे होते. तर आज स्टॅंडर्ड सोण्याचा भाव ७० रुपयांनी वाढून ३४,३७० प्रति तोळा इतका झाला आहे.