Gold Rate Today : 47500 च्या पुढं जाऊ शकतो सोन्याचा भाव, जाणून घ्या आजचे नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याची इंटरनॅशनल स्पॉट प्राईजमध्ये सोमवारी तेजी दिसून आली. कोरोना विषाणू आणि हाँगकाँग संदर्भात चीन आणि अमेरिका दरम्यान वाढत्या तणावामुळे पिवळ्या धातूच्या किंमतीही वाढल्या आहेत. सोमवारी दुपारी 01:30 वाजता सोन्याचा ऑगस्टचा वायदा भाव 0.10 टक्क्यांनी वाढून 47,135 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. पहिल्या व्यापार दिवशी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,104 रुपयांच्या पातळीवर बंद झाली होती. त्याचबरोबर चांदीचा वायदादेखील 1.28 टक्क्यांनी वाढून 50,758 रुपये प्रति किलो झाला. आदल्या दिवशी 50,118 च्या किंमतीवर बंद झाल्यानंतर सोमवारी ते 50,587 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडले.

आनंद राठी यांचे मूलभूत संशोधन विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी सांगितले की, ‘एकीकडे भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत, तर दुसरीकडे चीन आणि अमेरिका यांच्यातही तणाव वाढला आहे. यामुळेच सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. सराफा बाजारात सकारात्मक दृष्टीकोन आहे. यावेळी चांदीची किंमत देखील पाहावी लागेल, कारण चांदी आणि सोन्याचे प्रमाण 100 च्या खाली गेले आहे.

जागतिक बाजारपेठेची स्थिती
जागतिक बाजारपेठेबाबत बोलायचे अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये प्रचंड निदर्शने आणि चीनकडून होणाऱ्या तणावाच्या वृत्तांच्या दरम्यान सोमवारी गुंतवणूकदारांनी सोन्यावर विश्वास दर्शविला आहे. दरम्यान, जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.9 टक्क्यांनी वाढून 1,741.61 डॉलर प्रति औंस झाली. त्याच वेळी, गोल्ड फ्यूचर देखील 0.3 टक्क्यांनी वाढून 1,757.50 डॉलर प्रति औंस झाला.

47,500 पर्यंत जाऊ शकते सोन्याची किंमत
मे मध्ये सोन्याच्या किंमतीत 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्रिवेणी यांनी सांगितले कि, ‘एमसीएक्सवरील सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 47,000 ते 47,500 रुपयांपर्यंत व्यापार करू शकतात. तर चांदीची किंमत 51,300-51,800 रुपये प्रतिकिलो पातळीवर दिसून येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like