Coronavirus Impact : कोरोनाचा ‘हाहाकार’ ! ‘गोल्ड ज्वेलरी इंडस्ट्री’ला सर्वात मोठा झटका, मागणीमध्ये 75 टक्क्यांची ‘घट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनो विषाणूचा परिणाम आता भारतीय उद्योगांवर दिसू लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राणघातक कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी व्यवसाय आपली चमक गमवताना दिसत आहे. दररोज वाढत्या संसर्गामुळे ज्वेलरी उद्योगाच्या मागणीत 75 टक्क्यांनी घट झाली आहे. आता देशभरात फक्त 20 ते 25 टक्के व्यवसाय केला जात आहे. ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन म्हणाले की, दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत आहे. भीतीच्या वातावरणामुळे किरकोळ विक्रेते केवळ 20-25 टक्के व्यवसाय करत आहेत.

का झाली मागणी कमी?

(1) अनंत पद्मनाभन म्हणतात की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे (कोविड-19) लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याव्यतिरिक्त, खबरदारी म्हणून सरकारने मॉल, थिएटर आणि इतर गर्दीची ठिकाणे बंद केली आहेत. आता फक्त मूलभूत वस्तूच खरेदी केल्या जात आहेत.

(2) मार्च 2019 हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा महिना आहे, म्हणूनच या महिन्यात टॅक्स संबंधित सर्व मुदती पूर्ण करण्यासाठी दबाव वाढत आहे. ते म्हणाले, आगाऊ कर, जीएसटी, नोटाबंदी यासह टॅक्सविषयक अनेक कामे आयकर विभागाला सादर करायच्या आहेत, ज्यामुळे व्यवसायातील घट सतत वाढत आहे.

(3) लाला जुगल किशोर ज्वेलर्सच्या संचालक तान्या रस्तोगी, यांच्या मते देशातील जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये मागणी मुख्यत्वे विवाहांमुळे आहे. परंतु कोरोनो व्हायरसमुळे, असे कार्यक्रम रद्द केले जात आहेत. यामुळे लग्नाची खरेदी बंद झाली आहे.

(4) उमेदमल तिलोकचंद जावेरी ज्वेलरी स्टोअरचे मालक कुमार जैन म्हणतात की, यावर्षी लग्नाचा सिझन मुंबईच्या जावेरी बाजारातून गायब आहे. ते म्हणाले की, ‘जुलै पर्यंत लग्नाच्या तारखा आहेत, त्यामुळे व्यवसाय वाढत होता.’

(5) अनमोल ज्वेलर्सचे संस्थापक ईशू दतवानी म्हणाले, ग्राहकांच्या संख्येत 60-70 टक्क्यांनी घट झाली आहे आणि कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे व्यवसाय मंदावला आहे.