खुशखबर ! सोन्याच्या किमतीत मोठी ‘घसरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरण आणि स्थानिक मागणी कमी झाल्याने मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोने ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचवेळी चांदीच्या किमतीत ४८ रुपयांनी घट झाली आहे.

जुलैमध्ये सोन्याच्या किमतीत एक दिवस सर्वात मोठा नीचांक नोंदवला गेला होता. या अगोदर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पामध्ये सोन्यावर कस्टम्स ड्युटीत १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. परिणामी शनिवारी १३०० रुपये प्रति १० ग्रॅम अशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.

सोने आणि चांदी स्वस्त – 
दिल्लीच्या सराफा बाजारातील सोन्याचा भाव ६०० रुपयांनी कमी होऊन ३४,८७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचवेळी ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ६०० रुपयांनी कमी होऊन ३४,७०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे.

का स्वस्तं झाले सोने –
तज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सोन्याची मागणी कमी झाली आहे. म्हणूनच किंमती वेगाने खाली पडल्या आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींवरही दबाव आहे. तथापि, पुढील काही दिवसांत सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत घट राहू शकते.

चांदी खरेदी कारणदेखील झालं स्वस्त-
चांदीची किंमत ४८ रुपयांनी घसरून ३८,९०० रुपये प्रति किलो झाली आहे. सिल्व्हर फ्युचर्सची किंमत ३८,००० रुपये प्रति किलो झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका