‘या’ कारणामुळं सोन्याच्या किंमतीत कमालीची ‘वाढ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीनदरम्यान वाढणाऱ्या व्यापारी तणावामुळे सोन्याच्या किंमतींनी आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या खरेदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्यामुळे सोमवारी सोन्याचा भाव ८०० रुपयांनी वाढून ३६,९७० पर्यंत पोहोचला. औद्योगिकीक साहित्य आणि नाणी बनविण्यासाठी वाढलेल्या मागणीमुळे चांदीची किंमत देखील १००० रुपयांनी वाढून ४३,१०० रुपये प्रतीकिलो वर पोहोचली.

सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्याचे नेमके कारण :

मे २०१३ नंतर सोन्याच्या किंमतीचा हा सर्वोच्च स्तर आहे. किंमती इतक्या रेकॉर्डब्रेक स्तरावर पोहोचण्याची कारणे म्हणजे अमेरिका-चीनच्या व्यापारामध्ये वाढणारा तणाव आणि स्थानिक सराफांची वाढती मागणी ही आहेत. अमेरिकेने मागच्या आठवड्यात केलेल्या घोषणेप्रमाणे चीनमधून आयात केलेल्या ३०० अरब डॉलर मूल्याच्या साहित्यावर १ सप्टेंबर पासून अतिरिक्त शुल्क लावले जाणार आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लवकरात लवकर व्यापारी सामंजस्य करारानुसार निर्णय न घेतल्यास शुल्क आणखी वाढविले जाईल. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरल्याने देखील सोन्याचे भाव कडाडले आहेत.

सोन्याचे नवीन भाव :

देशाची राजधानी दिल्ली येथे ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असणाऱ्या सोन्याचा भाव प्रत्येकी ८०० रुपयांनी वाढून अनुक्रमे ३६,९७० आणि ३६,८०० रुपये प्रती तोळ्यापर्यंत पोहोचला. शनिवारी सोन्याचा भाव ५४० रुपयांनीं वाढून ३६,१७० प्रतितोळा इतका झाला होता.

चांदीचेही भाव वाढले :

तयार चांदीचे भाव देखील आज १००० रुपायांनी वाढून ४३,१०० प्रतीकिलो इतके झाले. चांदी सिक्के लिवाल ८५,००० तर बिकवाल ८६,००० प्रति शेकडा या किमतींवर स्थिर राहिले.

आरोग्यविषयक वृत्त