सोनं – चांदी पुन्हा ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढण्याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारात देखील झाला. दिल्लीत गुरुवारी सोने 15 रुपयांनी महागले. तर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. चांदी देखील 50 रुपयांनी महागली. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार युद्ध आणि हाॅंगकॉग मधील राजकीय परिस्थिती यामुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहे.

सोन्याच्या किंमती
दिल्लीत 10 ग्रॅम सोने 38,980 रुपयांनी वाढून 38,995 रुपये झाले. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 225 रुपयांनी वाढून 38,715 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याआधी मंगळवारी सोने 38,490 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

चांदीच्या किंमती
सोन्याबरोबरच चांदी देखील महागली. चांदीच्या किंमतीत 50 रुपयांनी तेजी आली. आता एक किलोग्रॅम चांदीचे दर 45,676 रुपयांनी वाढून 45,726 रुपये झाली, बुधवारी चांदी 45,040 रुपयांवरुन वाढून 45,480 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती.

का आली सोन्याच्या किंमतीत तेजी
HDFC सिक्युरिटीच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता पुन्हा वाढली आहे. यासाठी किंमतीत वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात रुपये मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमती जास्त वाढू शकल्या नाहीत.

नव्या जमान्याची Z जनरेशन खरेदी करत नाही सोने
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार जनरेशन Z म्हणजेच 1996 ते 2010 दरम्यान जन्माला आलेल्या व्यक्तींनी सोन्यात खास रुची दिसत नाही. या जनरेशनला आर्थिक मंदीची कोणतीही चिंता नाही. त्यामुळे लोक सोन्यात गुंतवणूक करत नाहीत. हा रिपोर्ट तयार करण्यासाठी भारत, चीन, अमेरिका, जर्मनी, कॅनडा आणि रशियात राहणाऱ्या 18 हजार लोकांचे आकडे जमा केले आहे.

Visit : Policenama.com