‘या’ 2 कारणांमुळं ‘सोनं-चांदी’ सलग तिसर्‍या दिवशी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याने आणि रुपया गडगडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोनं 32 रुपयांना महागलं. तर मागणी वाढल्याने चांदी देखील 116 रुपयांनी महागली. सराफांचे म्हणणे आहे की, येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच सोनं 14 हजार रुपये पार करणार नाही अशी शक्यता आहे आणि घट झाल्यास 39 हजार रुपयांवर सोन्याचे दर स्थिरावू शकतात.

सोन्याचे दर –
शुक्रवारी सोन्याच्या दरात 32 रुपयांनी वाढ होऊन सोनं 40,590 रुपयांवर पोहचले. गुरुवारी सोनं 40,458 रुपये 10 ग्रॅम झाले होते. बुधवारी सोनं 40,441 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात तेजी आली आहे. सोनं 1,555 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले. तर चांदीच्या किंमती 18.02 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले आहे.

चांदीचे दर –
मागणी वाढल्याने चांदी 47,756 रुपयांवर पोहचली. आज चांदीच्या दरात 116 रुपयांनी वाढ झाली. गुरुवारी चांदी 47,406 रुपयांवर पोहचली तर बुधवारी चांदी 42,272 रुपयांवर पोहचली होती.

का महागलं सोनं चांदी –
एचडीएफसी सिक्युरिटीचे सीनियर अॅनॉलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया गडगडला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे.

अशी करा सोन्याच्या खऱ्या-खोट्या दागिण्यांची पारख –
1. सोन्याचे दागिणे खरेदी करताना बीआयएस हॉलमार्क आवश्य पाहा. बीएसआय मार्क म्हणजे शुद्ध सोने. याबरोबर तुम्हाला हे देखील पाहावे लागेल की बीएसआय मार्क खरे आहे की खोटे. बीएसआय हॉलमार्कचे चिन्ह प्रत्येक दागिण्यावर असते त्याबरोबरच एक त्रिकोणी चिन्ह असते, यासह भारतीय मान ब्युरोच्या चिन्हासह सोन्याची शुद्धता लिहिलेली असते.

2.  सोन्याला पिणेने एका जागेवर घासा त्यावर नायट्रिक अॅसिडचे काही थेंब टाका. सोन्याचा रंग बदलला नाही तर सोनं शुद्ध, परंतु सोनं हिरवं झालं तर सोनं खोटं आहे.

3. खऱ्या सोन्याची ओळख लोहचुंबक वापरुन देखील केली जाते. एक स्ट्रॉंग चुंबक घ्या आणि तो सोन्याच्या बाजूला ठेवा, सोनं त्याकडे आकर्षित झाले तर सोन्यात इतर धातूंची मिलावट आहे असे समजावे. परंतु तसे झाले नाही तर सोनं शुद्ध समजावे.

4. पाण्याच्या माध्यमातून देखील तुम्ही सोन्याची चाचणी घेऊ शकतात. सोन्याला बादलीभर पाण्यात बुडवा, जर सोनं बुडलं तर सोनं खरं आहे आणि सोनं काही वेळ पाण्यावर तरंगलं तर सोनं खोटं आहे असं समजावं. सोनं कितीही हलकं असेल, कितीही कमी प्रमाणात असो, ते पाण्यात बुडते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/