खुशखबर ! ‘सोनं-चांदी’ झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रुपया मजबूत झाल्याने सोनं चांदी स्वस्त झालं आहे. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 51 रुपयांनी स्वस्त झाले. चांदीची मागणी घटल्याने चांदी थोडी थोडकी नाही तर 472 रुपयांनी स्वस्त झाली. अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारावर सहमती झाली आहे आणि जगभरात आलेल्या शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

सोन्याचे दर –
दिल्ली सराफ बाजारात आज सोनं 51 रुपयांनी घटून 40,688 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळवारी सोनं 40,807 रुपये झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1555 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले आणि चांदी 17.80 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर –
सोन्यासह चांदीच्या दरात देखील आज घसरण झाली. चांदीचे दर 47,285 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. आज चांदी 472 रुपयांनी स्वस्त झाली.

का स्वस्त होत आहे सोनं चांदी –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोनं चांदी स्वस्त झाले. त्यांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमतीत आलेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात तेजी आली. यामुळे रुपया मजबूत झाला.

सोन्याच्या दागिण्यांसंबंधित महत्वाच्या बाबी –
1. जर तुम्ही सोनं चांदी खरेदी/विक्री करणार असाल तर सर्वात आधी सोन्याचे दर नक्की पहा. कोणीही व्यक्ती IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.

2. IBJA द्वारे जारी करण्यात आलेले दर देशभरात सर्वमान्य असतात. या दरात 3 टक्के जीएसटीचा समावेश नसतो. सोनं विकताना तुम्ही IBJA च्या रेटचा तुम्ही आधार घेऊ शकतात.

3. तुम्हाला भाव माहित असल्यास तुम्ही सराफाकडून चांगला दर मिळवू शकतात. शुद्ध सोनं 24 कॅरेटचे असतं, परंतु दागिणे घडवताना त्यात इतर धातू मिसळेल जातात, कारण सोनं मऊ धातू आहे. त्यामुळे दागिण्यात 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो, ज्यात 91.66 टक्के सोनं असतं.

फेसबुक पेज लाईक करा –