चांदीच्या किमतीत ‘विक्रमी’ वाढ ! एका दिवसात ₹ 2000 ची वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्यानंतर आता चांदीच्याही किमती भरमसाठ वाढल्या असून चांदीने किमतीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात चांदीची किंमत दोन हजार रुपयांनी वाढून ४५,००० रुपये प्रति किलोवर गेली. तर सोन्याची किंमत मात्र १०० रुपयांनी घसरून ३८,३७० रुपये प्रति १० ग्रॅम झाली. अखिल भारतीय सराफ संघटनेच्या माहितीनुसार औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढतच असल्याने स्थानिक बाजारातील चांदीच्या किमती वाढत आहेत. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमधील सोने प्रति औंस १,५२०.३७ डॉलर, तर चांदी प्रति औंस १७.७२ डॉलर एवढी होती.

सोन्या-चांदीचे नवीन भाव :
देशाची राजधानी दिल्ली येथे ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असणाऱ्या सोन्याचा भाव प्रत्येकी १००-१०० रुपयांनी वाढून अनुक्रमे ३८,३७० आणि ३८,२०० रुपये प्रती तोळ्यापर्यंत पोहोचला. गिन्नीचा भाव देखील २०० रुपयांनी वाढून २८,८०० प्रति आठ ग्राम इतका झाला.

८ महिन्यांत सोने २० टक्क्यांनी महागले :
यावर्षी सोन्याच्या किंमतीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीला सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ३१,५०० रुपये होती, जी ८ महिन्यांत प्रति १० ग्रॅम ३८००० रुपयांपर्यंत वाढली आहे.

तीन महिन्यांत भारतात सोन्याच्या आयातीमध्ये ३५% वाढ :
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत देशाची सोन्याची आयात ३५ टक्क्यांनी वाढून सुमारे ८० हजार कोटी रुपये झाली आहे. सन २०१८-१९ च्या याच कालावधीत सोन्याची आयात ८.४५ अब्ज डॉलर (सुमारे ५९,००० कोटी रुपये) सोन्याची आयात झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like