सावधान ! ‘PAN’ कार्ड बाबत ही ‘चूक’ तर नाही ना केली ? भरावा लागेल 10 हजारांचा ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्ड बँकिंग व्यवहारासाठी अत्यंत महत्वाचे दस्तावेज मानले जाते. आता हेच पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. आयकर विभागाने पॅन आधार लिंक करण्याची मर्यादा देखील वाढवली आहे. ही मर्यादा वाढवून दिली असली तर अद्यापही 17 कोटी असे पॅनधारक आहेत ज्यांनी अद्यापही पॅन आधार कार्ड लिंक केलेले नाही.

दोन व्यक्ती किंवा दोन कंपन्याचे पॅन नंबर एकसारखे असू शकत नाही हे सत्य असले तरी जर कोणाकडे दोन पॅन कार्ड आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काही जणांकडे असे दोन पॅन कार्ड असेल तर ते कसे सरेंडर करायचे हे त्यांना माहित नसतं. त्यासाठी कायदेशीर कचाट्यातून सोडण्यासाठी दुसऱ्या पॅन कार्डपासून मुक्तता मिळवणं फायदेशीर असते.

लागू शकतो 10 हजार रुपयांचा दंड
जर कोणाकडे अतिरिक्त पॅन कार्ड असेल तर आयकर कायदा 1961 अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

अशावेळी काय करावे
एकाच व्यक्तीकडे एकाहून अधिक पॅन कार्ड असल्यास दुसरे सरेंडर करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येतो. यासाठी NSDL वेबसाइट किंवा ऑफिसमध्ये जाऊन Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data वर क्लिक करावं लागले. हा फॉर्म भरल्यानंतर जमा करावा लागेल.

या फॉर्ममध्ये जे पॅन कार्ड जारी ठेवायचे आहे, त्याचा उल्लेख सर्वात वर करावा लागेल, उर्वरित फॉर्मचा आयटम नंबर 11 मध्ये भरावा. याशिवाय जे पॅन कार्ड रद्द करायचे आहे त्याची कॉपी फॉर्मला जोडावी.

काही लोक वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पॅन कार्ड तयार करतात. डीमॅट खात्यासाठी वेगळे पॅन, आयकरासाठी किंवा रिटर्नसाठी वेगळे पॅन कार्ड लोक तयार करुन घेतात.

तसेच काही लोक जुने पॅन कार्ड हरवल्यानंतर नवे पॅनकार्ड तयार करता, त्यामुळे देखील काही जणांकडे अनेक पॅन कार्ड असतात.

डीमॅट खात्यासाठी आणि आयकराच्या पेमेंटसाठी वेगवेगले पॅन दिलेले असल्यास एक पॅन कार्ड सरेंडर करावे लागणार आहे. या दोन्ही ठिकाणी एकच पॅन नंबर द्यावा लागणार आहे. दुसरा पॅन कार्ड सरेंडर करुन आपल्या आधीच्या पॅन कार्डची माहिती पाठवून द्यावी.