Nokia चे 2 फीचर फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   स्मार्टफोन तयार करणार्‍या एचएमडी ग्लोबल (HMD Global) ने खूप लीक्सनंतर अखेर Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन लॉन्च केले आहेत. या दोन्ही फीचर फोनमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले दिले गेले आहेत. याशिवाय दोन्ही फोनमध्ये एफएम रेडिओ देण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलताना, कंपनीने दोन्ही लेटेस्ट फीचर फोनची किंमत 2,500 रुपयांच्या खाली ठेवली आहे. यापूर्वी कंपनीने क्लासिक रेट्रो डिझाईनसह Nokia 5310 फीचर फोन भारतीय बाजारात बाजारात आणला होता, ज्याला लोकांनी खूपच पसंती दिली होता. आणि आता Nokia 125 आणि Nokia 150 भारतात 2500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केले गेले आहेत त्यामूळे हे फोन JioPhone ला चांगलेच टक्कर देऊ शकतात.

नोकिया 125 आणि नोकिया 150 किंमत

कंपनीने Nokia 125 ची किंमत 1,999 रुपये आणि Nokia 150 ची किंमत 2,299 रुपये आहे. Nokia 125 फीचर फोन Charcoal ब्लॅक आणि पाउडर व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे, तर Nokia 150 फीचर फोन ब्लॅक, Cyan आणि रेड कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. त्याचबरोबर दोन्ही फिचर फोनची विक्री 25 ऑगस्टपासून सुरू होईल.

Nokia 125 फीचर फोन ची स्पेसिफिकेशन

Nokia 125 फीचर फोनमध्ये 2.4 इंचाचा QVGA कलर डिस्प्ले आहे. या फीचर फोनमध्ये T9-कीबोर्ड तसेच एमटीके सीपीयू 4MB रॅम आणि 4MB स्टोरेज आहे. यासह या फीचर फोनमध्ये वापरकर्त्यांना 1,020mAh बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त कनेक्टिव्हिटीसाठी या फीचर फोनमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि GSM 900/1800 नेटवर्क बँड सारख्या फीचर्स देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी या फोनचे वजन 91.3 ग्रॅम आहे.

नोकिया 150 फीचर फोनचे फीचर्स

नोकिया 150 मध्ये 2.4-इंचाचा QVGA कलर डिस्प्ले आहे. या फीचर फोनमध्ये टीT9-कीबोर्ड तसेच एमटीके सीपीयू, 4MB रॅम आणि 4MB स्टोरेज आहे. यासह या फीचर फोनमध्ये वापरकर्त्यांना 1,020mAh बॅटरी मिळेल. इतर फीचर्सविषयी बोलताना या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह VGA कॅमेरा दिला आहे. याशिवाय फीचर फोनमध्ये 3.5 एमएमचे हेडफोन जॅक, एमपी 3 प्लेयर आणि ब्लूटूथ 3.0 ची सुविधा दिली आहे. त्याच वेळी या फोनचे वजन 90.54 ग्रॅम आहे.

Nokia 5310 फीचर फोन

Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोनच्या आधी कंपनीने Nokia 5310 लाँच केले होते. या फोनमध्ये 2.4-इंचाचा QVGA डिस्प्ले दिला गेला आहे. हा फोन सीरीज 30+ ऑरेटिंग सिस्मटवर काम करते. तसेच, यात MT6260A सीपीयू दिला गेला आहे. फोनमध्ये 8 एमबीची रॅम आहे. तसेच, 16 एमबी स्टोरेज देखील देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे त्याचे स्टोरेज 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. त्याच वेळी, 3.5 3.5mm हेडफोन जॅक देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये माइक्रो यूएसबी (USB 1.1) आणि मिनी सिम कार्ड टाइप फोनमध्ये देण्यात आला आहे. ड्युअल सिम आणि सिंगल सिम मॉडेल्समध्ये फोन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कॅमेरा सेगमेंटविषयी बोलताना फोनमध्ये फ्लॅशसह VGA कैमरा दिला गेला आहे. फोनमध्ये ब्लूटूथ 3.9 देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायच झाल तर फोनमध्ये 1200 एमएएच क्षमतेची रिमूवेबल बॅटरी आहे. त्याची बॅटरी 7.5 तासांपर्यंतचा टॉकटाइम प्रदान करण्यास सक्षम आहे.