90 दिवसांच्या बॅटरी लाईफसोबत Realme इलेक्ट्रिक टूथब्रश M1 Sonic भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोन उत्पादक कंपनी रियलमीने आज भारतात आपला इलेक्ट्रिक टूथब्रश रियलमी एम1 सोनिक लाँच केला आहे. रियलमी एम1 सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रशची किंमत 1,999 रुपये आहे. ग्राहक इलेक्ट्रिक टूथब्रश 10 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून Realme.com आणि Flipkart वरून खरेदी करू शकतात. रियलमी एम1 सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश दोन कलर ऑपशन, ब्लू आणि व्हाइटमध्ये येईल.

Realme Adventurer Luggage आणि Realme Tote Bag2 चे झाले लाँचिंग
रियलमीकडून इलेक्ट्रिक टूथब्रशसोबतच दोन अन्य प्रॉडक्ट रियलमी अडव्हेंचर लगेज आणि रियलमी बॅग2 चे सुद्धा लाँचिंग करण्यात आले आहे. रियलमी अडव्हेंचर लगेजची किंमत 2,999 रुपये आहेत, तर रियलमी बॅग2 ची किंमत 999 रुपये आहे. या दोन्ही प्रॉडक्टची विक्री 10 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजतापासून सुरू होईल. हे रियलमी डॉट कॉम वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

रियलमी एम1 सोनिक स्पेसिफिकेशन्स
टूथब्रशमध्ये चार मोड सॉफ्ट, क्लीन, व्हाइट आणि पॉलिश देण्यात येतील. यूजर्स आपल्या गरजेप्रमाणे या मोडचा वापर करू शकतात. सोबतच टूथब्रशवरच बॅटरी लाइफची माहिती मिळेल. हा इलेक्ट्रक टूथब्रश 90 दिवसांच्या बॅटरी लाइफसोबत येईल. यामध्ये 800एमएएचची बॅटरी आहे. इलेक्ट्रिक टूथब्रशला 4.5 तासात फुल चार्ज करता येते. या बॅटरीला एका वर्षात 3 वेळा चार्ज करण्याची गरज भासते.

रियलमी एम1 सोनिकमध्ये मिळेल अँटीबॅक्टीरियल प्रॉपर्टी
रियलमी एम1 सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये सादर करण्यात आला आहे. एम1 इलेक्ट्रिक टूथब्रश हाय फ्रिक्वेंसी सोनिक मोटरसह येईल, जो 3400 वेळा प्रति मिनिट व्हायब्रेशन रेटसोबत येतो. म्हणजे एक मिनिटात ब्रश 3400वेळा व्हायब्रेट होईल. यामुळे दातांची चांगली स्वच्छता होते. या इलेक्ट्रिक ब्रशमध्ये 99.9% अँटीबॅक्टीरियल प्रॉपर्टी मिळेल. हा टूथब्रश 60डीबीपेक्षा कमी नॉईज प्रोड्यूस करतो. म्हणजे याचा जास्त आवाज होत नाही. इलेक्ट्रिक ब्रशमध्ये मेटल फ्री ब्रश हेड दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, रियलमी एम1 सोनिक आपल्या सेगमेंटमध्ये दातांची सर्वात चांगली स्वच्छता करतो.