Samsung नं लाँच केला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरियन टेक कंपनी सॅमसंग (Samsung) ने अखेर ए-सीरिजचा स्वस्त 5G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी A42 (Samsung Galaxy A42) ब्रिटनमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट डिस्प्लेसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त या नवीन डिव्हाइसला एकूण पाच कॅमेऱ्यांचा सपोर्ट मिळाला आहे. दरम्यान यापूर्वी कंपनीने ए 31 हँडसेटला जागतिक बाजारात उतरवले होते.

Samsung Galaxy A42 5G चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी A42 5G स्मार्टफोनचा लुक नुकताच लाँच झालेल्या गॅलेक्सी ए आणि एम सीरीजच्या फोनप्रमाणेच आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा सुपर अमोलेड इन्फिनिटी-यू डिस्प्ले आहे, ज्यामध्ये HD+ रेझोल्यूशन आहे. तसेच या फोनला स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, 4/6/8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा सपोर्ट मिळाला आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा सेक्शन

कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाल्यास, कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी A42 5G मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात पहिला 48MP चा प्राइमरी सेन्सर, दुसरा 8MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स, तिसरा 5MP चा डेप्थ सेन्सर आणि चौथा 5MP चा मॅक्रो लेन्स आहे. तसेच या फोनच्या फ्रंटमध्ये 20MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

सॅमसंगने गॅलेक्सी A42 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 15 वॅटच्या फास्ट चार्जिंग फीचरसह सुसज्ज आहे. या व्यतिरिक्त या डिव्हाइसमध्ये वाय-फाय, 5G, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy A42 5G ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी A42 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत GBP 349 (सुमारे 33,400 रुपये) आहे. या फोनची विक्री 6 नोव्हेंबरपासून ब्रिटनमध्ये सुरू होईल. सध्या या फोनच्या अन्य व्हेरियंटची किंमत अद्याप प्राप्त झालेली नाही. तसेच हा फोन भारतात लाँच करण्याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.