Samsung W21 5G स्मार्टफोन झाला लॉन्च, एमोलेड डिस्प्लेसह मिळणार एकूण चार कॅमेरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने चीनमध्ये नवीन फोल्डेबल फोन Samsung W21 5G लॉन्च केला आहे. या नवीन फोल्डेबल फोनची डिझाइन आणि जास्तकरुन वैशिष्ट्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 2 शी जुळतात. तथापि, Samsung W21 5G फोन भारतासह इतर देशांमध्ये लॉन्च करण्याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Samsung W21 5G स्पेसिफिकेशन

Samsung W21 5G स्मार्टफोनमध्ये 7.6 इंचाचा फुल एचडी प्लस एएमओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1,768×2,208 पिक्सेल आहे. जेव्हा या फोनची स्क्रीन फोल्ड होते, तेव्हा त्याच्या डिस्प्लेचा आकार 6.2 इंचाचा होतो. याशिवाय Snapdragon 865+ प्रोसेसर, 12 जीबी 12GB LPDDR5 रॅम आणि 512GB स्टोरेज या फोनमध्ये देण्यात आला आहे.

कॅमेरा सेक्शन

Samsung W21 5G मध्ये फोटोग्राफीसाठी कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये पहिले 12 एमपी प्राइमरी सेन्सर, दुसरे 12 एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि तिसरे 12 एमपी टेलिफोटो लेन्स आहेत. तसेच या फोनच्या पुढील भागात 10 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

जीएसएम अरेनाच्या अहवालानुसार, Samsung W21 5G स्मार्टफोन 4,500 एमएएच बॅटरीने सुसज्ज आहे. या फोनची बॅटरी 25 डब्ल्यू वायर फास्ट चार्जिंग, 11 डब्ल्यू वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पॉवरशेअरला सपोर्ट करते. याशिवाय या हँडसेटमध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यासारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आल्या आहेत.

Samsung W21 5G जी किंमत

Samsung W21 5G स्मार्टफोनची किंमत 19,999 चिनी युआन (सुमारे 2.23 लाख रुपये) आहे. या किंमतीवर, 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आणि फक्त गोल्ड कलर पर्याय उपलब्ध असतील. त्याचबरोबर या फोनची प्री बुकिंग 11 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 27 नोव्हेंबरपासून त्याची विक्री सुरू होईल.

Samsung Galaxy Z Fold 2

Samsung Galaxy Z Fold 2 स्मार्टफोन भारतीय बाजारात 1.48 लाख रुपये किंमतीत उपलब्ध आहे. Samsung Galaxy Z Fold 2 मध्ये 7.6 इंचाचा डिस्प्ले आहे, जो फोल्ड केल्यावर 6.2 होतो. यासह या फोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी स्नॅपड्रॅगन 865+ चिपसेट, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त या डिव्हाइसला 4,500mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा सपोर्ट आहे.