‘स्वदेशी’ ब्रॅन्ड Shinco नं लॉन्च केले 3 LED स्मार्ट TV, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   स्वदेशी ब्रँड Shinco ने गेल्या महिन्यात आपला 4K UHD स्मार्ट टीव्ही लॉन्च केला होता. हा स्मार्ट टीव्ही कंपनीने २०,९९९ रुपयांच्या किंमतीला लाँच केला होता. कंपनीने आता आपल्या स्मार्ट टीव्हीचे तीन नवीन मॉडेल्स SO43AS, SO50QBT आणि SO55QBT लाँच केले आहेत. हे स्मार्ट टीव्ही ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंचाच्या स्क्रीन आकारात लॉन्च करण्यात आले आहेत. हे तीन स्मार्ट टीव्ही ६ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या Amazon Prime Day Sale मध्ये उपलब्ध केले जातील. या सेलमध्ये लाँच झालेल्या तीनही स्मार्ट टीव्हीच्या मॉडेल्सवर सूट देण्यात येणार आहे. तसेच कंपनीचे इतर एलईडी टीव्हीदेखील कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येतील. ७,५९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर एलईडी टीव्ही घरी आणू शकता.

Amazon Prime Day Sale डील्स

नवीन स्मार्ट टीव्ही लाँच झाल्यावर कंपनी आपल्या बर्‍याच टीव्हीवर डील ऑफर देत आहे, जी ६ ते ८ ऑगस्ट यादरम्यान चालणाऱ्या सेलमध्ये देण्यात येईल. कंपनीचा ३२ इंचाचा एलईडी टीव्ही ८,५९९ रुपयांऐवजी ७,५९९ रुपयांना विकला जाईल. यावर १ हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. याशिवाय कंपनीच्या आणखी एका ३२ इंचाच्या एचडी रेडी स्मार्ट टीव्हीवरही १ हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. हा १०,५९९ रुपयांऐवजी ९,५९९ रुपयांच्या किंमतीला उपलब्ध केला जाईल. त्याचबरोबर कंपनीने गेल्या महिन्यात सुरू केलेला ४३ इंचाचा ४के यूएचडी स्मार्ट टीव्ही २०,९९९ रुपयांच्या किंमतीला उपलब्ध करुन दिला जाईल.

नव्याने लाँच झालेला ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही १८,१९९ रुपयांऐवजी १६,६९९ रुपयांना उपलब्ध केला जाईल. यावर १,५०० रुपयांची सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर कंपनीचा ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही २५,९९९ रुपयांऐवजी २४,२५० रुपयांना उपलब्ध केला जाईल, तर ५५ इंचाचा टीव्ही २९,९९९ रुपयांऐवजी २८,२९९ रुपयांना उपलब्ध केला जाईल.

फीचर्स

नव्याने लॉन्च केलेला स्मार्ट टीव्ही ४३ इंचाचा फुल एचडी स्मार्ट टीव्ही Android 8.0 सह येतो. हा १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेजसह येतो. हा Uniwall UI आणि प्रमाणित अ‍ॅप्ससह येतो. तसेच कंपनीचा ५० इंच आणि ५५ इंच ४के यूएचडी स्मार्ट टीव्ही Android 9.0 सह येतो. यात २ जीबी रॅम+१६ जीबी स्टोरेज आहे. हे स्मार्ट टीव्ही क्वाड कोर A55 प्रोसेसर आणि dbx-tv साऊंड टेक्नॉलॉजीवर चालतात.