कोणतीही जुनी स्कूटर, मोटरसायकल आणा आणि बदल्यात नवीन अ‍ॅम्पीअर स्कूटर मिळवा, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता अ‍ॅम्पीअर व्हेईकल्सजवळ झिरो एमिशन अंतर्गत इलेक्ट्रिक स्कुटरची मोठी रेंज आहे. अ‍ॅम्पीअर हा भारतातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांचा एक प्रमुख ब्रँड आहे. मीडिया रिपोर्टनुसार अ‍ॅम्पीअर व्हेईकल्सने आता भारतात आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी क्रेड आर सह भागीदारी केली आहे. या भागीदारीनंतर आता कंपनी एक्सचेंज प्रोग्राम सुरू करणार आहे. या प्रोग्राममध्ये आपण कोणत्याही पेट्रोल स्कूटरची देवाणघेवाण करू शकता आणि त्याऐवजी नवीन अ‍ॅम्पीयर स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता. अधिकाधिक लोकांना या एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळावा यासाठी कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या बदल्यात इलेक्ट्रिक स्कूटरच नव्हे तर पेट्रोल स्कूटर आणि बाईकच्या बदल्यातही घरी नेण्याची परवानगी अ‍ॅम्पीयर कंपनी देत आहे. या कार्यक्रमाचा लाभ ग्राहकांना मिळेल तसेच देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटीलाही प्रोत्साहन दिले जाईल.

अ‍ॅम्पीयर व्हेईकल्सने यावर्षी जूनमध्ये मॅग्नेस प्रो इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले, जे कंपनीच्या लाइनअपमधील प्रमुख मॉडेल आहे. यासह, अ‍ॅम्पीयरकडे आता लीड-अ‍ॅसिड बॅटरी मॉडेल्सपासून लिथियम-आयन ई-स्कूटरपर्यंतची इलेक्ट्रिक स्कूटरची विस्तृत श्रृंखला आहे. परंतु अधिक विक्री करण्यासाठी, ईव्ही निर्मात्याने आता एक्सचेंज प्रोग्राम सुरू करण्यासाठी क्रेड आर सह भागीदारी केली आहे.

जर आपल्याकडे पेट्रोल स्कूटर किंवा दुचाकी असेल, आणि त्याऐवजी आपल्याला अ‍ॅम्पीयर स्कूटर पाहिजे असेल तर प्रथम आपल्याला आपल्या जवळच्या अ‍ॅम्पीयर डीलरशिपकडे जावे लागेल. यानंतर, काही व्यावसायिक आपल्या जुन्या बाईकची किंवा स्कूटरची स्थिती तपासतील. यानंतर आपल्या वाहनाच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. सत्यापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण आपला इच्छित स्कूटर निवडू शकता आणि आपल्या जुन्या वाहनाची किंमत नवीन स्कूटरच्या किंमतीपासून कमी केली जाईल.

या ऑफरच्या बदल्यात आपण केवळ नवीन अ‍ॅम्पीयर स्कूटरच खरेदी करू शकत नाही, तर यामुळे वाढत्या प्रदूषणास जबाबदार असलेल्या रस्त्यावरील जुने वाहने देखील काढून टाकली जातील.