सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आंध्र प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या एजन्सीजच्या मदतीने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना ईएमआयवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स प्रदान करण्यावर विचार करत आहे. राज्य सरकारचे सध्याचे कर्मचारीच नव्हे तर ही योजना सहकारी समित्या, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि पेन्शनर्सला सुद्धा कव्हर करेल.

या योजनेमुळे प्रदूषणाचा स्तर कमी करता येईल, पेट्रोल-डिझेलचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स सिंगल चार्जमध्ये 40-100 किमीच्या दरम्यानच्या रेंजमध्ये यूईल. याशिवाय, ईव्हीवर तीन वर्षांपर्यंत फ्री मेंटेनन्स सुद्धा दिला जाईल. इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची रक्कम कर्मचारी 24 ते 60 महिन्यांच्या आत चुकवू शकतात.

आंध्र प्रदेशचे राज्य उर्जा सचिव श्रीकांत नागुलपल्ली यांच्यानुसार, न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एपी लिमिटेडला ईएमआय योजना संचालित करण्याचा अधिकार दिला जाईल. योजना यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल, जिथे गाव किंवा वार्ड सचिवालयाचे कर्मचारी आणि अन्य कमी वेतनवाले कर्मचारी योजनेचा लाभ घेतील. आंध्र प्रदेश सरकार लवकरच या योजनेची अधिकृत नोटीस प्रकाशित करणार आहे.

आंध्र प्रदेशने अगोदरच आपले ईव्ही धोरण जारी केले आहे. या योजनेद्वारे ई-मोबिलिटी इकोसिस्टम स्टेक होल्डर्सला प्रोत्साहित करून राज्याला एक इलेक्ट्रिक मोबिलिटी हब बनवणे आहे. आंध्र प्रदेश सरकारने ईव्ही पार्क विकसित करण्यासाठी 500 ते 1,000 एकर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये प्लग-अँड-प्ले अंतर्गत पायाभूत संरचना, सामान्य सुविधा आणि बाहेरील पायाभूत संरचना सुद्धा असेल.