Nano पेक्षाही छोटी कार १८ एप्रिलला होणार लाँच ; १ लिटर पेट्रोलमध्ये धावणार ३६ km

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुचाकीवरून गैरसोयीचा प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडेल अशी कार उत्पादित करावी या हेतूने टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी ‘नॅनो कार’ निर्मितीची कल्पना मांडली होती. ‘लाखात देखणी’ म्हणून या कारला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता नॅनो कारपेक्षाही छोटी कार लवकरच बाजारपेठेत दाखल होत आहे. ‘बजाज क्युट’ (Bajaj Qute) असे या कारचे नाव असून ‘बजाज ऑटो’ कंपनीने ती तयार केली आहे. भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या कारला परवानगी दिली असून १८ अप्रैल २०१९ ला ही छोटी कार लाँच होणार आहे.

कारची वैशिष्ट्ये –

इंजिन – 216 cc , सिंगल-सिलेंडर, ट्विन-स्पार्क इंजिन, पेट्रोल किंवा सीएनजी इंजिनवर चालणारे , 5-स्पीड गियरबॉक्स

स्पीड -३६ kmph ; टॉप स्पीड ७०kmph

चार प्रवाशी बसण्याची सोय असणारी ही कार पेट्रोल किंवा सीएनजीवर चालणारी आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या या कारमध्ये डीटीएसआय ४ इंजिन बसविण्यात आले असून पेट्रोलची टाकी ८ लिटर क्षमतेची आहे. ही कार एक लिटरमध्ये ३६ किमीचे मायलेज देते. या कारची निर्मित्ती भारतात होत असून कारची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होणार आहे. पेट्रोल इंजिन असणाऱ्या कारची किंमत २. ६४ लाख रुपये असून CNG साठी २. ८४ लाख रुपये असणार आहे.

Bajaj Qute ही कार सर्वप्रथम २०१२ मध्ये ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. तीन चाकी रिक्षाला पर्याय असलेले हे वाहन बाजारपेठेतील वाहनांपेक्षा भिन्न वर्गाचे ठरले होते . त्यामुळे परवानगीवरून ते वादात सापडले. २०१२ पासून भारतात क्युट या कारचा चतुर्भज वाहनाच्या श्रेणीमध्ये समावेश व्हावा तसेच या कारला विक्रीची परवानगी मिळावी यासाठी बजाजने दिलेला लढा दिला. त्यानंतर २०१६ मध्ये तिच्या आवृत्तीत बदल करण्यात आले. २०१८ मध्ये भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने चतुर्भज वाहनाच्या निर्मितीला मान्यता दिली. त्यामुळे आता Bajaj Qute ही कार लाँच करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच ही कार रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

Loading...
You might also like