Benelli आपल्या बाईक Imperiale 400 वर देतंय विशेष ऑफर, दरमहा 4,999 रुपये देऊन आणू शकता घरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान वाहन निर्माता कंपन्या उत्सवाच्या मोसमासाठी पूर्णपणे तयारी करत आहेत. दरम्यान इटालियन प्रीमियम बाईक निर्माता कंपनी बेनेलीने आपल्या सर्वात लोकप्रिय बाईक Benelli Imperiale 400 साठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही ही बाईक दरमहा फक्त ४,९९९ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

काय आहे ऑफर?

Benelli Imperiale 400 वर कंपनी ८५ टक्के कर्जाची सुविधा देत आहे. त्याचबरोबर ईएमआय देखील ४,९९९ रुपयांवर करण्यात आला आहे. म्हणजेच तुम्ही ही बाईक खरेदी घेतल्यास तुम्हाला डाऊनपेमेंट रक्कम केवळ १५ टक्के द्यावी लागेल. ज्यानंतर तुम्ही थकित रकमेवर कर्ज घेऊ शकता.

इंजिन, पॉवर आणि किंमत

बेनेली इम्पीरियल ४०० मध्ये इलेक्ट्रॉनिक इंधन इंजेक्शनसह BS6 कंप्लायंट SOHC, सिंगल-सिलेंडरयुक्त फोर-स्ट्रोक, एअर-कूल्ड इंजिन आहे. जे ६,००० आरपीएमवर २१ बीएचपीची अधिकाधिक उर्जा आणि ३,५०० आरपीएमवर २९ एनएमचे टॉर्क आउटपुट तयार करते. भारतात बेनेली इम्पीरियल ४०० ची किंमत १.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

फक्त एवढ्या रुपयात करू शकता बुकिंग

बेनेली या बाईकसह तीन वर्षाची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी आणि दोन वर्षांची सेवा देखील देत आहे. तसेच तीन वर्षाचा वार्षिक देखभाल करार, पिक अँड ड्रॉप सुविधा आणि २४x७ आरएसए सेवा समाविष्ट आहे. तुम्हाला ही बाइक खरेदी करायची असल्यास ६००० च्या टोकन रकमेसह ही कंपनीच्या वेबसाइटवर किंवा तुमच्या जवळच्या बेनेली डीलरशिपद्वारे बुक करू शकता.

बेनेली इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विकास झाबख म्हणाले की, “आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी एक अशी योजना सादर करताना आनंद होत आहे, ज्यामुळे ते इम्पीरियल ४०० खरेदी करू शकतात. या उत्सवात लोक आपल्या बाईकची स्वप्ने सहजपणे पूर्ण करु शकतात. आम्हाला खात्री करायची होती की, कोरोना संकट आमच्या चाहते आणि ग्राहकांसाठी अडथळा ठरू नये.”