COVID-19 : ‘या’ भारतीय फार्मा कंपनीला मिळाली कोरोनाचं औषध favipiravir तयार करण्याची परवानगी

हैदराबाद : वृत्तसंस्था – बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्सने फॅवीपिरवीर (Favipiravir) ‘कोविड-१९’ चे औषध तयार करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून परवाना प्राप्त केला आहे. हे औषध कोविड-१९ च्या सौम्य ते मध्यम प्रकरणांमध्ये वापरले जाते. या व्यतिरिक्त डीसीजीआयने भारतात ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटकांची निर्मिती आणि त्याच्या निर्यातीलाही मान्यता दिली आहे. Biophore India ने सांगितले की, तुर्कीमधील स्थानिक भागीदाराच्या सहकार्याने एपीआयची निर्यात करण्यासही मान्यता मिळाली आहे आणि त्याशिवाय कंपनी अनेक भारतीय भागीदारांशी भारतातील उत्पादनाचे व्यापारीकरण करण्यासाठी चर्चा करत आहे. त्याचबरोबर बांगलादेश आणि इजिप्तच्या कंपन्यांशी निर्यातीसाठी चर्चा सुरू आहे.

बायोफोरचे संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक अधिकारी (सीएसओ) माणिक रेड्डी पुल्लागुर्ला म्हणाले की, कोविड-१९ महामारीने औषध कंपन्यांना सुरक्षिततेशी तडजोड न करता त्वरीत प्रभावी उपाय शोधण्याच्या आणि विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. आम्ही सुनिश्चित केले आहे की, आमचे फॅवीपीरवीर गुणवत्तेच्या उच्च मानकाला पूर्ण करते. ते म्हणाले, आमच्या उत्पादन सुविधा अमेरिका आणि युरोपीय संघाच्या नियमांचे पालन करतात आणि हे सुनिश्चित करण्यासाठी आमच्याकडे कडक अंतर्गत आयात नियंत्रणे आणि गुणवत्ता तपासणी आहे.

फॅविपीरवीर हा एक अँटीव्हायरल एजंट आहे, जो सुरुवातीला शोधला गेला आणि विकसित केला गेला होता, कारण हा एक आरएनए (रिबोन्यूक्लिक ऍसिड) विषाणू, इन्फ्लूएंझा व्हायरस विरूद्ध आपल्या क्रियाशीलतेमुळे विकसित झाला होता. भारत आणि तुर्की व्यतिरिक्त हे पहिलेच रशिया आणि मध्य-पूर्वेच्या काही भागांमध्ये कोविड-१९ विरूद्ध वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर जगाच्या इतर भागात सध्या टप्प्याटप्प्याने चाचण्या सुरू आहेत.

बायोफोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश बाबू रंगिसेट्टी म्हणाले की, फॅविपिरवीर बनवण्यासाठी सर्व साहित्य इन-हाऊस विकसित केले गेले आहे. जगदीश बाबू म्हणाले, आम्हाला खात्री आहे की हे एपीआय आपल्या देशाला कोविड-१९ विरुद्ध संयुक्त संघर्षात पुढे जाण्यास मदत करेल.

हैदराबादची फार्मा कंपनी बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्सची स्थापना २००८ मध्ये झाली होती. हैदराबादमध्ये याचे ८०,००० चौरस फूट संशोधन आणि विकास केंद्र आहे, जेथे औषधांचे फॉर्म्युले तयार केले जातात. त्यांनी अमेरिका, चीन, जपान, रशिया, ब्राझील, कोरिया, ऑस्ट्रेलिया, इज्राईल आणि युरोपीय संघात सुमारे १०० पेटंट दाखल केले आहेत आणि ५० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करत आहे.