BMW ग्रुपनं भारतात सादर केला नवा Logo, नवा ब्रँड आणि कॉर्पोरेटची ओळख दर्शवणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बीएमडब्ल्यू ग्रुपने भारतात आपला नवा लोगो लाँच केला आहे. नवा लोगो कंपनी ऑनलाइन आणि ऑफलाइन संचालनासाठी वापरणार आहे आणि नवा ब्रँड आणि कॉर्पोरेट ओळख सुद्धा दर्शवतो. बीएमडब्ल्यूचे म्हणणे आहे की, नवीन ब्रँडचे डिझाइन खुलेपणा आणि स्पष्टता यासाठी आहे.

नवीन लोगो द्विमितीय आहे. हा लोगो बीएमडब्ल्यू विश्वातील ग्राहकांचे महत्त्व देखील दर्शवितो. बीएमडब्ल्यूचे म्हणणे आहे की, हे परिवर्तन बीएमडब्ल्यू मोटर वाहनाच्या जगतात टेक्नोलॉजी आणि कनेक्शन्स सोबत समतोल दर्शवते. नवीन लोगो बीएमडब्ल्यू, बीएमडब्ल्यू आय, आणि बीएमडब्ल्यू एम वर लागू असेल.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अ‍ॅक्टींग प्रेसीडेंट, अर्लिनड्रो टिक्सीएरा यांनी म्हटले, बीएमडब्ल्यूने नेहमी आपल्या सन्मानित ग्राहकांसोबत संबंध मजबूत केले आहेत. अभिनव प्रॉडक्ट्स आणि मूल्यवर्धित सर्व्हिसेज सादर केल्या आहेत. नवा ब्रँड डिझाईन आणि लोगो खुलेपणा आणि स्पष्टता दर्शवतो. हा भविष्यात गतीशीलता आणि ड्रायव्हिंग आनंदासाठी ब्रँडचे महत्व आणि प्रासंगिकतेचे प्रतिक आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया डिजिटलीकरणाचे आव्हान आणि संधीसाठी तयार आहे.

बीएमडब्ल्यूने नुकतेच विक्रम पवाह यांना बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट म्हणून 1 ऑगस्ट 2020 पासून प्रभावी नियुक्त केले आहे. सोबतच बीएमडब्ल्यू ग्रुप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सह त्यांच्याकडे सध्याचे पदही असणार आहे.

पवाह 2017 पासून बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत आहेत. जेव्हा त्यांना प्रेसिडेंट म्हणून बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियात सहभागी करण्यात आले होते. 2018 मध्ये त्यांना बीएमडब्ल्यू ग्रुप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडचे सीईओ नियुक्त केले गेले. एप्रिल 2020 मध्ये प्रेसिडेंट आणि सीईओ रुद्रतेज सिंह यांच्या आकस्मिक निधनाने बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियामध्ये एक अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पासून, चीफ फायनान्शियल ऑफिसर, अर्लिनड्रो टिक्सीएरा अ‍ॅक्टिंग प्रेसिडेंट म्हणून भूमिका पार पाडत आहेत.