हाय हिल्समुळं कार चालवताना होऊ शकतो धोका, महिलांनी व्हा सावधान

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   आज आपला देश प्रगती पथावर आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. ट्रेन चालविण्यापासून विमान उडविण्यापर्यंत महिला पुरुषांना टक्कर देत आहेत. बऱ्याचश्या महिला घरगुती किंवा ऑफिसच्या कामकाजासाठी कारदेखील चालवितात. तसे पाहायचे झाल्यास कार चालविणे मोठी गोष्ट नाही. परंतु कार चालविताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. जी बहुतेक स्त्रिया घेत नाही. उदाहरणार्थ, पार्टीला जाताना किंवा कामासाठी कोठेतरी जाताना बहुतेक स्त्रिया हील्स घालून कार चालवितात, जे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.

हिल्सचा ड्रायव्हिंगवर होतो परिणाम :

जेव्हा आपण हिल्स घालून गाडी चालवित असाल तेव्हा आपल्या पायाची स्थिती सरळ असावी लागते. ज्यामुळे पायाच्या पंजाची हालचाल व्यवस्थित होत नाही. या व्यतिरिक्त ब्रेक, एक्सलेटर आणि क्लचचा वापर करताना आपण हिल्सचा अँकल त्यात अडकण्याचा धोका असतो. ज्यामुळे महिलांचे ड्रायव्हिंग दरम्यान कारच्या कंट्रोलवर अचूकपणे नियंत्रित राहत नाहीत आणि अपघात होतो.

धोक्याला निमंत्रण :

हिल्स घालून कार चालविताना स्त्रिया ब्रेक किंवा एक्सलेटरवर किती दबाव आणला पाहिजे याचा अंदाज घेण्यास सक्षम नसतात. कारण हिल्सचा पॉईंट आधीच कारच्या सर्फेसला टच करत आहे आणि पायाची दिशा अगदी सरळ होते. अशा परिस्थितीत पायाच्या प्रेशरचा अंदाज घेणे फार कठीण आहे. कोणत्याही प्रकारचे फुटवेयर असो परंतु ड्रायव्हिंग करताना फ्लॅट असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला पायांची स्थिती आणि पेडल्सवरील दाब याची चांगली कल्पना येईल. कधीकधी हिल्सचा पॉईंट गाडीच्या पेडल्समध्ये अडकतो, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते

कारच्या मॅटिंगची घ्या काळजी :

यासह, जेव्हा आपण हिल्स घालून कार चालविता तेव्हा आपल्या कारच्या त्या भागातील मॅटिंगचीही काळजी घ्या. जिथे एक्सलेटर,क्लच आणि ब्रेकिंग सिस्टम दिले गेले आहे. जर तेथे फॅब्रिक मॅट असेल आणि ते फाटले असेल तर आपला पाय त्यामध्येही अडकू शकतो. कारण हिल्स टोकदार असल्याने आपला पाय फाटलेल्या मॅटच्या भागामध्ये अडकू शकतो आणि ब्रेक लावताना होऊ शकते कि योग्य वेळी ब्रेक लागत नाही आणि आपण अपघातास बळी पडू शकता.