Coronavirus Lockdown : DL अन् वाहनाच्या सर्टिफिकेटची मुदत संपलेल्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, केलं ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्यांचे प्रमाणपत्र अलीकडेच समाप्त झाले किंवा येत्या काही दिवसांत नूतनीकरण करायचे होते अशा सर्व वाहन मालक आणि चालकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सरकारने या तारखांना 14 एप्रिल 2020 पर्यंत वाढविले आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार फिटनेस प्रमाणपत्रांच्या वैधता, सर्व प्रकारच्या परवानग्या, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रे ज्यांना लॉकडाऊनमुळे वाढवता येऊ शकत नाही. त्या सर्व प्रमाणपत्राची तारीख वाढविली आहे. 1 फेब्रुवारी नंतर समाप्त झालेली कोणतीही कागदपत्रे आता 30 जून 2020 पर्यंत वैध मानली जातील.

या लॉकडाऊन कालावधीत सर्व राज्यांची परिवहन कार्यालये बंद आहेत. त्यामुळे टॅक्सी, बस, अझीसारख्या व्यावसायिक वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन्स समाप्त झाले आहे त्यांचे लायसन्स आता 30 जून 2020 पर्यंत वैध मानली जातील.

मंत्रालयाने शेवटी सांगितले की, बरीच वाहने देशातील अत्यावश्यक सेवा चालविण्यात गुंतलेली आहेत आणि त्यांना लॉकडाऊन दरम्यान प्रमाणपत्रे / कागदपत्रांचे नूतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे या वाहनांच्या चालकांना त्रास होणार नाही आणि त्यांचे कर्तव्य बजावताना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून प्रवर्तन अधिकाऱ्यांना 30 जून 2020 पर्यंत सर्व कागदपत्रे वैध मानण्यास सांगितले आहे.