टोल प्लाझावर आजपासून Fastag अनिवार्य; जाणून घ्या, खरेदी करण्यासाठी काय करावे ?

पोलिसनामा ऑनलाईन – 15 फेब्रुवारीपासून भारतातील प्रत्येक वाहनावर फास्टॅग अनिवार्य केले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले की, फास्टॅग अनिवार्य करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. म्हणून वाहनधारकांना त्वरित ई-पेमेंट सुविधा स्वीकारण्याची विनंती केली जात आहे. 2016 मध्ये फास्टॅग लागू केलं असून यामुळे टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच्या लांब लागणार्‍या रांगांपासून मुक्तता होईल.

फास्टॅगची मुदतवाढ वाढविणार नाही
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील फास्टॅगच्या प्रश्नाला उत्तर देताना माध्यमांना सांगितले की, सरकारने फास्टॅग नोंदणीची तारीख दोन-तीन वेळा वाढविली आहे. त्यापुढे मुदतवाढही दिली जाणार नाही. याक्षणी प्रत्येकाने त्वरित फास्टॅग खरेदी करावे. रस्त्यावर चालणार्‍या सुमारे 90 टक्के लोकांनी वाहनांसाठी फास्टॅग विकत घेतला आहे, आता केवळ 10 टक्के लोक शिल्लक आहेत.

फास्टॅग कुठे खरेदी करायचा
टोल प्लाझावर फास्टॅग खरेदीसाठीही उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही बँक, पेटीएम इत्यादी माध्यमातूनही खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही हे अ‍ॅमेझॉन.इन, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक तसेच पेटीएम पेमेंट्स बँक वरून खरेदी करू शकता. केंद्र सरकारने वाहनांसाठी फास्टॅगची अंतिम मुदत 1 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली.

जाणून घ्या, फास्टॅग म्हणजे काय?
फास्टॅग हे एक स्टिकर आहे, जे वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिटवलेले असते. कोणत्याही रोख व्यवहारासाठी वाहन थांबविणे गरजेचं नाही. टोल प्लाझावर टोल देण्यासाठी हे आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यात टोल प्लाझावर घेतलेली रक्कम एफएएसटीएगशी संबंधित खात्यातून थेट वजा केली जाते.