ore R1 ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑटो एक्सपो फेब्रुवारी 2020 मध्ये आयोजित केलं जाणार आहे. यावेळी ऑटो एक्सपोमध्ये चीनची फेमस कार निर्माता कंपनी ग्रेट वॉल मोटर्स भारतात आपल्या गाड्या सादर करणार आहे. सोबतच ती भारतात आपला व्यवसाय सुरू करणार आहे. ही कार निर्माता कंपनी एसयुव्ही आणि इलेक्ट्रीक कार ओरा आर1 सादर करणार आहे. ओरा आर 1 जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आहे.

ओरा आर 1 हाय टेक्नोलॉजीने डिझाईन केलेली कार आहे. ज्यात आर्टीफिशियल इंटेलिजेंस सिस्टीम आणि कनेक्टीव्हिटी फीचर सिस्टीम समाविष्ट आहे. या सिस्टीमला व्हॉईस कमांडने अ‍ॅक्टीवेट केलं जाऊ शकतं. हॅलो ओरा म्हणून व्हॉईस कमांड अ‍ॅक्टीवेट केली जाऊ शकते. या कारचा वेग 100 कमी प्रति तास असेल. ही इलेक्ट्रीक चार्ज कार असल्याने यासाठी कोणत्याही इंधनाची आवश्यकता नाही. कंपनी या कारसाठी 3 वर्षे किंवा 120000 किमी आणि 8 वर्षे किंवा 150000 किमीची गॅरंटी देत आहे.

ओरा आर 1 फुल्ली ऑटोमेटीक इलेक्ट्रीक कारची किंमत $8680 पासून $11293 पर्यंत निश्चित केली गेली आहे. भारतीय चलनात सांगायचे झाले तर 6 लाख ते 8 लाखांच्या आसपास या कारची किंमत आहे. भारतीय ग्राहक भविष्यात ही कार खरेदी करू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/