‘या’ 4 कारणांमुळे पुढील महिन्यात महागणार कार, मोजावी लागेल पहिल्यापेक्षा जास्त रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील आघाडीच्या कार निर्मात्या कंपन्या पुढील महिन्यात म्हणजे 2021 पासून आपल्या कारच्या किंमतींमध्ये वाढ करणार आहेत. यामुळे तुम्हाला नवीन वर्षात कार खरेदी करताना जास्त रक्कम चुकवावी लागेल. MG Motors आणि Renault कडून कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ऑटो सेक्टरमध्ये मंदी असताना अखेर ऑटोमेकर्स एकाच वेळी कारच्या किंमती वाढवणयाचा निर्णय का घेत आहेत, हे बहुतांश लोकांना समजलेले नाही. कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला आहे, ही कारणे कोणती ते जाणून घेवूयात-

कच्चा मालाच्या वाढत्या किंमती :
कारच्या कच्चा मालाच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. यामध्ये प्लास्टिक, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमचा समावेश आहे. ऑटोमोबाइल कंपन्यांनी 2020 पर्यंत किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला नव्हता, परंतु तोटा टाळण्यासाठी आता किंमती वाढवल्या जात आहेत.

नवीन नॉर्म्स :
देशातील नवीन सेफ्टी नॉर्म्स आणि बीएस 6 नॉर्म्समुळे वाहनांच्या निर्मितीचा खर्च वाढला आहे. तरीही कंपन्यांनी किंमतीत वाढ केली नव्हती. या कारणामुळे नवीन वाहनांच्या किंमती वाढणार आहेत.

मंदी आणि महामारी :
2019 मध्ये मंदीमुळे ऑटो सेक्टरवर वाईट परिणाम झाला होता. विक्री दोन दशकांपेक्षा खाली आली होती. कंपन्यांना 2020कडून अपेक्षा असतानाच कोरोना महामारी आली आणि कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आता किंमती वाढवल्या जात आहेत.

इनपुट कॉस्टमध्ये वाढ :
केवळ कच्चा मालच नव्हे, तर इतर इनपुट कॉस्ट वाढल्यानेही कारच्या किंमती वाढण्याचे मोठे कारण आहे. ऑटो सेक्टरमध्ये पहिल्यापेक्षा सध्या कमी वर्कर काम करत आहेत. ज्यामुळे काम मंदगतीने होत आहे. यामुळे नुकसान होत आहे. सोबतच कार निर्मितीमध्ये अन्य खर्चसुद्धा अगोदरच्या तुलनेत खुपच वाढला आहे, ज्यामुळे ऑटो सेक्टर आता आपल्या वाहनांच्या किंमती वाढवत आहे.