खुशखबर ! 2020 मध्ये पहिल्यांदाच पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमतरतेचा परिणाम आता देशांतर्गत इंधन बाजारावरही दिसून येत आहे. शनिवारपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती, परंतु आज त्यामध्ये घट दिसून आली आहे. सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोल सुमारे 11 पैसे तर डिझेल 6 पैशांनी स्वस्त झाले आहे.

8 जानेवारी रोजी किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता आणि त्यापूर्वी सलग सहा दिवस पेट्रोल आणि डिझेल महागले होते. अशाप्रकारे, जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली आहे, 31 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोल 75.14 रुपये प्रतिलिटर होते. डिझेलचा दर प्रति लिटर 67.96 रुपये होता. जानेवारी महिन्यात पेट्रोल 1.21 रुपयांनी महाग झाले होते, पण आजच्या घसरणीने काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, किमतीच्या घसरणीनंतर दिल्लीत पेट्रोल 75.90 रुपये, मुंबईत 81.49 रुपये, कोलकाता 78.48 रुपये, चेन्नई 78.86 रुपये, गुरुग्राम 75.16 रुपये आणि नोएडा 76.95 रुपये, तर याच शहरात डिझेल अनुक्रमे 69.11 रुपये, 72.47 रुपये, 71.48 रुपये, 73.04 रुपये, 67.93 रुपये, आणि 69.39 रुपये इतके आहे. सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 11 पैसे आणि डिझेलच्या दरात 5 पैशांची कपात करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/