…तर वाढणार ‘पेट्रोल’, ‘डिझेल’चे भाव, घर बसल्या जाणून घेता येणार इंधनाचे ‘दर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत मागील 3 दिवसांपासून कोणतेही बदल झालेले नाहीत. परंतू आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 4 दिवसापासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे ही वाढ अशीच सुरु राहिली तर पेट्रोल डिझेलच्या किंमती लवकरच वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमती 71.84 रुपये आहे. तर डिझेलची किंमती 65.11 रुपये प्रति लीटर आहे.

इंडियन ऑइलच्या वेबसाइट नुसार, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमती गुरुवारी क्रमश: 74.50 रुपये, 77.50 रुपये आणि 74.62 रुपये प्रति लीटर आहे. डिझेलची किंमती क्रमश: 67.49 रुपये, 68.26 रुपये प्रति लीटर आहे.

असे तपासाच्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव –
SMS च्या माध्यमातून ग्राहक एका रजिस्टर नंबरवरुन एसएमएस पाठवून किंमतीची माहिती करुन घेऊ शकतात. यामुळे सध्याच्या पेट्रोलची किंमत तुम्हाला एका क्लिकवर मिळू शकेल.

एसएमएस पाठवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पेट्रोल पंप डिलरकडून कोड मागू शकतात. जे तुम्हाला मेसेज मिळण्यासाठी आवश्यक आहे.

इंडियन ऑइल ग्राहक RSP <डीलर कोड> 9224992249 यावर मेसेज पाठवू शकतात.
बीपीसीएल ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर मेसेज पाठवू शकतात.
एचपीसीएल ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर मेसेज पाठवू शकतात.