गतवर्षीच्या जूननंतर पहिल्यांदाच आज सर्वात ‘स्वस्त’ झालं Petrol, जाणून घ्या ‘पेट्रोल-डिझेल’चे आजचे दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. ज्याचा फायदा भारतीय बाजारात दिसून येत आहे. 1 दिवसाच्या स्थिरतेनंतर आज गुरूवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण नोंदवली गेली. तेल कंपन्यांनी आज (12 मार्च 2020) पेट्रोलच्या किमतीत 15 पैसे प्रति लीटरची कपात केली. तर डिझेलच्या दरात 12-13 पैसे प्रति लीटरला कमी करण्यात आले. तेल कंपन्या रोज सकाळी 6 वाजात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर 

मुंबई 75.84 – 65.97

पुणे 75.57 –  64.57
अहमदनगर 76.15 –  65.14
औरंगाबाद 76.93 –  66.94
धुळे 76.26 –  65.25
कोल्हापूर 76.08 –  65.09
नाशिक 76.27 –  65.24
रायगड 76.32 –  65.25

4 रुपयापर्यंत स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल 

अंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात कपातीचा परिणाम थेट स्थानिक बाजारात दिसून येत आहे. यावर्षी आतार्यंत पेट्रोलच्या दरात 4 रुपये प्रति लीटर कपात झाली आहे. तर, डिझेलच्या दरात आतापर्यंत 4.15 रुपये प्रति लीटर पर्यंत कपात झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया तेजी आल्यास स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये 3-4 रुपये प्रति लीटरपर्यंत कपात होऊ शकते. पण जर, रुपयात पुढेही कमजोरी कायम राहिली तर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठ्या कपातीची शक्यता कमी होईल.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता