70 रुपयाच्या खाली आले पेट्रोलचे दर, आज सलग 5 व्या दिवशी झालं ‘एवढं’ स्वस्त

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमधील घसरण सोमवारीदेखील सुरूच राहिली. मागच्या काही दिवसात क्रुड ऑईलच्या किमतीत मोठी घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत आहेत. दिल्लीत सोमवारी पेट्रोलचा दर 70 रुपये प्रति लीटरपेक्षा खाली आला आहे. दिल्लीत सोमवारी पेट्रोलमध्ये 16 पैशांची घसरण झाली आहे, ज्यामुळे पेट्रोल 69.59 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर, डिझेलमध्ये सोमवारी 15 पैशांची घसरण झाली, ज्यामुळे हे 62.29 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. महाराष्ट्रातील आजचे दर पुढील प्रमाणे…

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 75.30 – 65.21
पुणे 75.25 – 64.15
अहमदनगर 75.88 – 64.77
औरंगाबाद 76.01 – 64.89
धुळे 75.25 – 64.18
कोल्हापूर 75.31 – 64.25
नाशिक 75.57 – 64.47
रायगड 75.06 – 63.95

कोलकातामध्ये सुद्धा सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कोलकातामध्ये सोमवारी पेट्रोलचे दर 16 पैशांनी घसरले, ज्यामुळे ते 72.29 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. येथे डिझेल 15 पैशांनी घसरले असून 64.62 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क साधारण 3 रूपयांनी वाढवल्याने क्रुड ऑईलमधील मोठ्या घसरणीचा मोठा फायदा देशातील ग्राहकांना सध्या तरी मिळताना दिसत नाही.

मुंबई पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण झाली असून येथे दर 16 पैशांनी घसरले आहेत. येथे पेट्रोल 75.30 रुपये प्रति लीटरवर आले आहे. तर डिझेल 16 पैशांच्या घसरणीसह 65.21 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. चेन्नईत सोमवारी पेट्रोल 17 पैसे स्वस्त होऊन 72.28 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर, डिझेल 16 पैशांच्या घसरणीसह 65.71 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.