खुशखबर ! सलग 5 व्या दिवशी डिझेल ‘स्वस्त’, पेट्रोलच्या किमती ‘स्थिर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या हंगामात नागरिकांना इंधन दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. 5 दिवसांपासून पेट्रोलच्या किमती स्थिर असून डिझेलच्या किमती सलग तिसर्‍या दिवशी खाली आल्या आहेत. राजधानी दिल्लीत रविवारी पेट्रोलचे दर स्थिर राहिले. तसेच डिझेलच्या किंमतीत 7 पैशांची कपात करण्यात आली.

चार महानगरांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर –
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमधील पेट्रोलचे दर अनुक्रमे 73.27 रुपये, 75.92 रुपये 78.88 रुपये आणि 76.09 रुपये प्रतिलिटर आहेत. तसेच डिझेलचे दर अनुक्रमे 66.17 रुपये, 68.60 रुपये, 69.43 रुपये आणि 69.97 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले आहेत.

दररोज सकाळी 6 वाजता बदलतात किंमती –
पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत लागू होईल. एक्साईज ड्युटी जोडल्यानंतर, डीलर त्यांच्या किंमतीवर सर्व काही कमीशन करतो, त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. त्यामुळे सर्व पेट्रोल पंपावर 6 वाजता हे दर बदलले जातात.

SMS द्वारे मिळवू शकता इंधनाचे दर
आपण दररोज आपल्या शहरातील इंधनाच्या किंमत तपासू शकता. रोज बदलणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी एसएमएसच्या माध्यमातून ग्राहक विशिष्ट नोंदणीकृत क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. शहरात इंधनाचे दर काय आहेत हे जाणून घेण्यासाठी डिलर किंवा व्यापाऱ्यांसाठी इंडियन ऑयल ग्राहक RSP <डीलर कोड> 92249 9 2249 या नंबरवर मेसेज करू शकतात. ग्राहकांसाठी एचपीसीएल ग्राहक कोड HPPRICE <डीलर कोड> 9222201122 या नंबरवर मेसेज करावा लागेल.

visit : Policenama.com