खुशखबर ! ‘RBI’ नं वाढवली ‘RTGS’ ची वेळ, आता ‘या’ वेळेत करता येणार मोठ्या रक्कमेचे ‘व्यवहार’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – RBI ने सामान्य माणसाला उपयोग पडेल असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. RBI कडून रियल टाइम ग्रॉस सेलटमेंट म्हणजेच RTGS प्रणालीचा वेळ वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता सकाळी 7 वाजल्यापासून RTGS ची सुविधा वापरता येणार आहे. ही सुविधा आधी 8 वाजता सुरु होत होती. ही सुरुवात 26 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना आता दुसऱ्यांच्या खात्यात लगेचच पैसे ट्रान्सफर करता येणार आहे. ही सेवा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असल्याने बंद होती. रविवारी देखील ही सेवा बंद असते.

RTGS मधून किती पैसे करता येतात ट्रान्सफर –
आरटीजीएसच्या माध्यमातून 2 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात येते, यासाठी काही विशेष वेळ ठरवण्यात आलेली होती. परंतू आता RBI ने ही वेळ 1 तास अधिक वाढवली आहे.

RTGS चे नवे टायमिंग –
आरबीआयने RTGS च्या वेळेत वाढ केली आहे. आता सकाळी 8 ज्या जागी ही सेवा 7 वाजता सुरु करण्यात येईल. आता ही वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल. तर इंटर बँक ट्रान्जेक्शनची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 7.45 पर्यंत आहे. नव्या प्रणालीत आता RTGS ची वेळ वाढवण्यात आली आहे.

You might also like