आता सहज मिळणार ‘ग्रीन कार्ड’, अमेरिकेत स्थायिक होणे होणार सोपे

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत ग्रीन कार्ड संबधी नवीन बिल पास झाले आहे. ग्रीन कार्ड वरील ७% असलेली सीमा आता काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे भारत आणि भारतासारख्या विकसनशील देशांतील विद्यार्थी आणि नोकरदारवर्गाला त्याचा मोठा फायदा मिळणार आहे. विशेषतः IT क्षेत्रात काम करणाऱ्या आणि अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या अपेक्षा त्यामुळे वाढल्या आहेत.

ग्रीन कार्ड कोणत्याही अमेरिकी नसलेल्या व्यक्तीला अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची परवानगी देते. जगातील वेगवेगळ्या देशातील प्रतिभावान लोकांना आपल्या देशात आमंत्रित करून अर्थव्यवस्थेचा विकास साधणे हे यामागील तत्व आहे. त्याचबरोबर चांगल्या राहणीमानाच्या अपेक्षेने अमेरिकेसारख्या देशात स्थायिक होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांसाठीही हि सुवर्णसंधी असते.

अमेरिकेच्या ४३५ सदस्यीय हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटिव्हमध्ये हे बिल ६५ विरुद्ध ३६५ असे पास झाले आहे. स्किल्ड इमिग्रेंट्स ऍक्ट, २०१९ असे या कायद्याचे नाव आहे. ग्रीन कार्ड सोबतच एच -१ बी व्हिसाची संख्याही वाढवण्यात येणार आहे. त्यातून IT क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय लोकांना फायदाच होणार आहे.तज्ज्ञांच्या मते २०१८ पर्यंत सुमारे ३ लाख भारतीय लोक ग्रीन कार्डसाठी वेटिंग लिस्ट मध्ये होते. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ या धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा कायदा पास होणे विशेष ठरते.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !