मोदी सरकारचा ‘Google Tax’ बद्दल मोठा निर्णय ? ‘Netflix’, ‘Amazon Prime’ वर थेट ‘इम्पॅक्ट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये मोठी कमाई करत असलेल्या डिजिटल स्ट्रीमिंग कंपन्यांवर मोठा टॅक्स लागू शकतो. आयकर विभाग नेटफ्लिक्स आणि अमॅझॉन प्राइम यांसारख्या डिजिटल स्ट्रीमिंग कंपन्यावर गुगल टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही कारण हा टॅक्स त्या लोकांकडून वसूल केला जाणार आहे जे लोक जाहिराती नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईमवर देतात. अर्थसंकल्पात गुगल टॅक्स वाढवण्याची तरतूद केली जाऊ शकते.

काय आहे सरकारचे नियोजन

डिजिटल स्ट्रीमिंग कंपन्यांवर Equalisation Levy म्हणजे गुगल टॅक्स लागू होऊ शकतो.
Netflix, Amazon Prime यांसारख्या कंपन्यावरही हा टॅक्स लागू शकतो.
हा टॅक्स २०१७ लागू झाला होता.

काय आहे गुगल टॅक्स ?
एकेकाळी गुगल टॅक्सने ऑनलाईन विश्वात खळबळ माजवली होती. ऑनलाईन जाहिराती देणाऱ्या कंपन्यांवर हा कर लावण्यात येतो. अनेक टेक्नॉलॉजी कंपन्या जाहिराती फक्त ऑनलाईनच देतात. या गुगल टॅक्सच्या माध्यमातून या कंपन्यांवर टॅक्स लावते.

याचा अर्थ स्पष्ट आहे की फेसबुक आणि गुगलवर ज्या कंपन्यांकडून जाहिराती देण्यात येतात, त्यांच्यावर कर देखील लावण्यात येतो. गुगलसारख्या कंपन्यांकडून प्रत्येक जाहिरातीवर पैसे कमावते. यामुळे सरकारने कंपन्यांवर इंटरनेटवर देण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे होणाऱ्या फायद्यावर टॅक्स लावला आहे.

मल्हार सेना आपणास महाराष्ट्रात फिरू देणार नाही : राष्ट्रवादी’च्या प्रदेशध्यक्षांना इशारा

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी