आता घेता येणार नाही व्हॉट्सअ‍ॅपचे ‘स्क्रीनशॉट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या स्क्रीनशॉटचा उपयोग अनेक युझर्स पुरावा देण्यासाठी करतात. मात्र यापुढे व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट काढता येणार नाहीत. कारण व्हॉट्सअ‍ॅप लवकरच स्क्रीनशॉट काढण्यास बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर आणत आहे. ‘फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन’ फीचर नाव आहे. गोपनीयता वाढवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून ही पावलं उचलण्यात येत आहेत.

काही दिवसांपासून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचरवर काम सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या स्क्रिनशॉटवर बंदी आणण्यासाठी ऑथेंटिकेशनमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन नावाचे एक नवीन फंक्शन असणार आहे. त्यामुळे युजर्सला स्क्रीनशॉट घेता येणार नाही. मात्र हे फंक्शन वापरणं युझर्ससाठी ऐच्छिक राहणार आहे. ज्याप्रमाणे युझर्सला प्रायव्हसी सेटिंग्जमधून लास्टसीन लपवता येत त्याचप्रमाणे स्क्रीनशॉट घेता येणं लॉक करता येणार आहे.

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फंक्शन –

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा ऑप्शन पाहण्यासाठी तुम्हाला सेटिंग्ज > अकाऊण्ट > प्रायव्हसी चेक करावं लागेल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप ऑटोमॅटिकली लॉक करण्यासाठी एक मिनिट, दहा मिनिटं, तीस मिनिटं किंवा लगेच असे पर्याय असतील. फिंगरप्रिंट चुकीचे असले, किंवा अनेक वेळा चुकीचे प्रयत्न झाले, तर व्हॉट्सअ‍ॅप काही मिनिटांसाठी लॉक होईल.

असे करा स्क्रिनशॉट लॉक –

एकदा हे फंक्शन सुरू झाल्यानंतर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन अनेबल केल्यानंतर युजर्स चॅटचे स्क्रिनशॉट घेऊ शकत नाही. मात्र, ज्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने फिंगरप्रिंट्स अनेबल केले नसेल तर स्क्रिनशॉट काढता येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप २. १९. १०६ बीटा व्हर्जन अपडेट झाल्यानंतर मीडिया फाइल शेअरिंगसाठी वेगळा इंटरफेस मिळणार आहे. त्यामध्ये इमोजी आणि स्टीकर्ससाठी दोन नवीन स्वतंत्र टॅब असणार आहेत. त्याशिवाय, इन्स्टाग्रामसारखे वेळ, लोकेशन आणि अन्य स्टीकर्स दिसणार आहेत.