शेतकऱ्यांवरील लाठीमार भाजपला महागात पडेल : सुप्रिया सुळे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

आमच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला अटक करु किंवा लाठीमार करु, ही भाजपची दडपशाही आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांविरुद्धही दबावतंत्राचा वापर करत आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चावर केलेला लाठीमार भाजप सरकारला महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. खासदार सुळे सध्या नगरच्या दौऱ्यावर असून त्या विविध ठिकाणी सभा व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा देत भाजप सरकारवर टीका केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fdb211fa-c78a-11e8-905d-0fc95cf1048f’]

नगरमधील पक्ष कार्यालयात सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच शहरातील राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अंबादास गारुडकर आदी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, दिल्लीत मोर्चा नेणारे शेतकरी आक्रमक नव्हते. ते दिल्लीत येणार हे सरकारला माहिती होते, तरीही त्यांना विरोध केला जात होता. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकारने त्यांचा आवाज दडपण्यासाठीच लाठीमार केला. शेतकऱ्यांवरील हा लाठीमार भाजपला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष नको : आरएसएस

राफेल विमान खरेदी घोटाळ्याबाबत त्या म्हणाल्या, या व्यवहारात अनेक मुद्दे संशयास्पद आहेत. सरकार स्वत:चा पारदर्शी असा प्रचार करते आहे तर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला का तयार होत नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत त्या म्हणाल्या, रस्त्यातील खड्डय़ांमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, अनेकांचे मृत्यू त्यामुळे घडलेले आहेत, जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. सरकार या प्रश्नावर असंवेदनशील आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालावे. मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता असताना, आमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, असे म्हणत होते, आता कोणावर गुन्हा दाखल करायचा, या मृत्यूला जबाबदार कोण याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपविरोधी आघाडीत प्रकाश आंबेडकर व एमआयएम सहभागी नाहीत, याकडे लक्ष वेधले असता खा. सुळे म्हणाल्या, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा, आघाडीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांच्या सभेला गर्दी होते, ती मतात परिवर्तित होईलच, असे नाही.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4135fa90-c78e-11e8-8c57-a3fb2d0f5797′]