Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune | कात्रज चौकात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune | पुणे शहरातील (Pune City) कात्रज (Katraj) परिसरात पुणे पोलिसांनी (Pune Police) उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. कात्रज परिसराचा पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) समावेश होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरी त्या परिसरात म्हणावा तसा विकास न झाल्याने आमरण उपोषण (Hunger Strike) सुरु केले होते. मागील दोन दिवसांपासून गावकऱ्यांनी कात्रजमध्ये ठिय्या मांडला होता. अखेर पुणे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज (Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune) करत नागरिकांनी हुसकावून लावले.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

अमृता बाबर (Amrita Babar) यांनी सांगितले की, वेळेवर पाणी सोडण्याची (Water Supply) मागणी करण्यासाठी आम्ही काही महिलांसह पंपिंग स्टेशनकडे (Pumping Station) गेलो होतो. त्यावेळी त्याठिकाणी कोणतीही महिला पोलीस कर्मचारी नसताना आम्हाला आडवण्यात आले. तसेच पुरुष पोलिसांकडून आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. पोलिसांनी लाठीहल्ला करुन आंदोलन (Agitation) दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बाबर यांनी केला आहे.

याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांनी सांगितले, ज्या ठिकाणी आंदोलन सुरु होते त्यामागे पंपिंग स्टेशन आहे. याठिकाणी पाणीपुरवठा करणारे मोठे पंप बसवण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी (Protesters) अचानकपणे त्याठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला. हे प्रतिबंधित क्षेत्र (Restricted Area) असल्याने आंदोलकांना परत जाण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांना बाहेर काढताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली.

 

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

चुकीच्या करपद्धतीमधून महापालिका आमच्यावर दरोडा टाकतेय

गावांचा समावेश कवेळ कर वसूली करण्यासाठी केला जात असून आमच्या व्यथांकडे कोणाचेच लक्ष नाही.

आम्ही कर भरतो मग सुविधा का देत नाहीत

कात्रज व समाविष्ठ गावातील पाणीप्रश्न, वाहतुकीची समस्या, 25 वर्षात एकही क्रीडांगण, महापालिकेचे मोठे रुग्णालय झाले नाही

गुंठेवारीचा तीनपट कर रद्द करुन तो एकपट करवा आणि दंड माफ करावा.

Web Title :- Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune | Pune Police Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | चारचाकी गाड्यांचे सायलेंन्सर चोरणार्‍यांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक, 3.70 लाखाचा मुद्देमाल जप्त

Tata IPL 2022 | …म्हणून आयपीएलचा पुण्यातील ‘हा’ सामना हलवला मुंबईला, वाचा सविस्तर

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा