Latika Gorhe Passed Away | विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Latika Gorhe Passed Away | विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या तसेच स्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या मातोश्री लतिका दिवाकर गोऱ्हे (वय ८७) (Latika Gorhe Passed Away) यांचे सोमवारी (दि. 20) सकाळी निधन झाले. त्यांच्या मॉडेल कॉलनी, पुणे येथील निवासस्थानी गेली 42 वर्षे त्यांचे वास्तव्य होते.

लतिका गोऱ्हे (Latika Gorhe Passed Away) यांचा जन्म 2 ऑगस्ट 1935 रोजी पंढरपूर येथे देशपांडे कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीपाद आप्पाजी देशपांडे आणि आई अनुसया देशपांडे यांच्या सुसंस्कृत आणि मोठ्या कुटुंबात त्यांचे संस्कार पूर्ण शिक्षण झाले. या कुटुंबीयांचे विशाळगड संस्थानशी जवळचे संबंध होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह प्रख्यात संशोधक व पशूवैद्यकीय तज्ञ डॉ. दिवाकर गोऱ्हे (Researcher and Veterinary Expert Dr. Diwakar Gorhe) यांच्याशी झाला. विवाहानंतर लतिका गोऱ्हे यांनी पदवीचे बी.ए. चे शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्यांचे वास्तव्य काही काळ बडोदा, मुंबई आणि त्या नंतर पुणे येथे 42 वर्षे होते. साहित्याची त्यांना विशेष आवड होती. बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhari यांच्या कवितांचे प्रकट वाचन त्यांनी केले होते.

अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, भारत अशा विविध देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. अखिल भारतीय महिला परिषदेच्या (All India Women’s Council) जळगाव व भारततातील महिला परिषदातही त्या सहभागी झाल्या होत्या. केदारनाथ पासुन ते कन्याकुमारी पर्यंतच्या विविध तीर्थ क्षेत्राना त्यांनी भेटी दिल्या होत्या. स्त्री आधार केंद्राला 3 जानेवारी 23 रोजी 35 वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात त्यांनी भाषण देखील केले होते.

नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील माझा 25 वर्षे या पुस्तक प्रकाशनासाठी 2018 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवसेना भवनातील कार्यक्रमात त्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याशी त्यांचा चांगला परिचय होता.

त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन सुविद्य कन्या विधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि औषधशास्त्र
विभागात आशिया विभागात काम केलेल्या स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी आहेत.
तसेच नातवंडे मुक्ता व हिमाद्री, सत्यजित व सतलज, रश्मी व नीरज, रोशनी व संबीत, असा मोठा परिवार आहे.

डॉ. दिवाकर गोऱ्हे यांच्यासोबत भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (Indian Agro Industries Foundation)
या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मणीभाई देसाई आणि इतर पदाधिकारी यांच्याशी त्यांचे
जिव्हाळ्याचे संबंध होते. क्रांतिकारी महिला संघटना व स्त्री आधार केंद्र या दोन्ही संस्थांशी त्यांचे मातृत्वाचे आणि
जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवाजीनगर महिला मंडळ, पुणे शहर महिला मंडळ, पंढरपूर महिला मंडळ, अन्नपूर्णा
महिला मंडळ अशा विविध संस्थांवर त्यांचे कार्य राहिले आहे. काही संस्थांमध्ये उपाध्यक्ष व पदाधिकारी म्हणुन
तीन दशके त्यांनी काम पाहिले आहे.

लतिका गोऱ्हे यांना विधान भवनातील विविध अधिकारी, कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Web Title :- Latika Gorhe Passed Away | Legislative Council Deputy Chairman Dr. Condolences to Neelam Gorhe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhagat Singh Koshyari | पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे परखड मत, म्हणाले- ‘दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे…’

Maharashtra Politics | आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्यावर शिवसेना शिंदे गट घेणार मोठा निर्णय