ट्रक-बस अपघातात २९ जण जखमी

लातूर :  पोलीसनामा ऑनलाईन – लातूर-औसा रोडवर ट्रक आणि बसचा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील २९ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मंगळवारी दुपारी बस भरधाव वेगात औसा येथून लातूरकडे येत होती. बस  हासाळा पाटी जवळ आली असता पुढे असलेल्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न बस चालकाने केला.  त्यावेळी त्याला समोरून येणाऱ्या  ट्रकवर बस जोरात आदळली. यात बसच्या समोरच्या काचा फुटल्या. धडक झाल्याने जोराचा धक्का बसला. यात अनेकांच्या चेहऱ्याला, डोक्याला मार लागला काही प्रवासशाचे तोंड व डोके फुटले. दातालाही दुखापत झाली.

हा अपघात झाल्यानंतर तात्काळ  नागरिकांनी घटनास्थळी  धाव घेतली व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेत  प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.