लातुरात ८  मराठा आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर: पोलीसनामा ऑनलाईन 
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यभरात हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत . आता लातूर येथील औसा तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या ८ कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला . मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे दुर्घटना टळली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयात जोरदार आंदोलन केले आहे. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत, तहसील परिसर दणाणून सोडले . त्यानंतर मराठा क्रांती  मोर्चाच्या आंदोलकांपैकी आठ जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन ,आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना वेळीच रोखल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df6ad8f4-94ab-11e8-9287-7f7f67130f13′]
मराठा  आरक्षणाच्या संदर्भात लातूरच्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत जो निर्णय घेण्यात येत आहे, तो चुकीचा आहे. त्यांना यातील कायदेशीर बाबी कळत नाहीत, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. राणेंच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. आज हे सर्व कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल येथील मराठा भवन येथे जमले आणि त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन  केले.
आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या दिला आहे. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी आंदोलकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.