Latur ACB Trap | दहा हजाराची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता जाळ्यात

लातूर : Latur ACB Trap | गावठाणातील डीपीवरुन शेतीचा विद्युत पंपासाठी वीज पुरवठा सुरु ठेवण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून १० हजार रुपये स्वीकारताना महावितरणच्या (MSEB) सहायक अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Latur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले.

माधवराज सुधाकरराव बिराजदार Madhavraj Sudhakarrao Birajdar (वय ४०) असे या महवितरण कार्यालयातील सहायक अभियंत्याचे (Assistant Engineer) नाव आहे. (Latur ACB Trap)

याबाबतची माहिती अशी, लातूर शहरालगत असलेल्या हरंगुळे येथील महावितरण कार्यालयात बिराजदार हे
सहायक अभियंता आहेत. नागझरी गावठाण येथील डीपीवरुन तक्रारदारासह इतर दोघा शेतकर्‍यांना शेतीचा
विद्युत पंप सुरु ठेवण्यासाठी आणि गावठाण डीपीचा शेतीपंपाला वीज पुरवठा सुरु करावा, या कामासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लातूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करताना बिराजदार याने १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर लातूर शहरातील बार्शी मार्गावरील एका बारजवळ सोमवारी सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना माधवराव बिराजदार याला पकडण्यात आले.

Web Title :- Latur ACB Trap | Assistant engineer of Mahavitaran caught in the net for accepting a bribe of ten thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Aaron Finch | ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा