Latur ACB Trap | 24 हजार रुपये लाच मागणाऱ्या लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला लिपीकावर एसीबीकडून FIR

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीचे मेडिकल बिलासाठी मदत करण्यासाठी 24 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand a Bribe) लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील (Latur SP Office) महिला वरिष्ठ लिपीकावर लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Latur ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. कल्याणी जितेंद्र सोनवणे Kalyani Jitendra Sonwane (वय-41) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. लातूर एसीबीने (Latur ACB Trap) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.13) गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत 38 वर्षाच्या व्यक्तीने लातूर एसीबीकडे (Latur ACB Trap) शुक्रवारी (दि.10) तक्रार केली होती. कल्याणी सोनवणे यांची मूळ नेमणूक नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात (Nanded SP Office) असून सध्या त्या प्रति नियुक्तीवर लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीचे मेडिकल बिलाची मागील वर्षाची फाईल मंजूरी करिता पुढे पाठवल्याचा मोबदला म्हणून दोन हजार रूपये व जानेवारी महिन्यात मंजुरीसाठी दाखल केलेल्या इतर तीन मेडिकल बिलाच्या फाईल विना त्रुटी जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, लातूर येथे पाठविण्यासाठी आणि बिल मंजुरी (Bill Approval) करिता मदत करण्यासाठी 22 हजार रूपये असे एकूण 24 हजार रूपयाची लाच कल्याणी सोनवणे यांनी मागितली.

तक्रारदार तक्रार केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आणि सोमवारी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार हे सोनवणे यांनी मागणी केलेली रक्कम देण्यासाठी गेले असता, सोनवणे यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर सोमवारी पुन्हा मागणी केलेली रक्कम देण्यासाठी तक्रारदार गेले असता सोनवणे यांना पुन्हा संशय आल्याने लाच स्विकारण्यास टाळाटाळ केली.
कल्याणी सोनवणे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.
पुढील तपास लातूर एसीबीचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली करीत आहेत.

 

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde),
अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण (Addl SP Dharamsingh Chavan), लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड (DySP Pandit Rejitwad)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली (Police Inspector Bhaskar Pulli) यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Latur ACB Trap | FIR by ACB against lady clerk of Latur Superintendent of Police who demanded Rs 24 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली होती! देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Vasai Crime News | ‘मरने दे साले को’ म्हणत कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं

Pune Crime News | सेक्‍सटॉर्शन प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर